ETV Bharat / state

सावित्रीबाईंना शेण, दगड मारले होते; पण १८४८ साली त्यांच्या पहिल्याच शाळेत होत्या ४५ मुली - सावित्रीबाई फुले जयंती

सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा येथील नायगाव येथे नेवासे पाटलांच्या घरी झाला. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्या भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका होत्या. जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल जाणून घेऊया काही विशेष गोष्टी...

savitribai phule birth anniversary
सावित्रीबाई फुले
author img

By

Published : Jan 3, 2020, 10:16 AM IST

Updated : Jan 3, 2020, 2:17 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात मुलींना शिक्षण मिळावे यासाठी शेण, माती, दगडांचा मारा झेलणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 188 वी जंयती आहे. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा येथील नायगाव येथे नेवासे पाटलांच्या घरी झाला. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्या भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका होत्या. शिक्षिका म्हणून काम करताना त्यांच्यावर शेण, माती, दगड फेकले गेले. मात्र, त्यांनी न डगमगता त्यावेळी मुलींना शिक्षण दिले. त्यांचाच आदर्श घेत १८४८ ला सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत जवळपास ४५ मुली शिकण्यासाठी आल्या होत्या. यावरून मुलींना त्याकाळी शिक्षणाची किती आवड होती, हे दिसून येते.

सावित्रीबाईंना शेण, दगड मारले होते; पण १८४८ साली त्यांच्या पहिल्याच शाळेत होत्या ४५ मुली

सावित्रीबाई फुलेंबद्दल काही विशेष गोष्टी...

  • १८३१ - सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा येथील नायगाव येथे नेवासे पाटलांच्या घरी झाला.
  • १८४० - वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला.
  • १८४७ - ज्योतिरावांची मावस बहीण सगुणाऊला मागासांच्या वस्तीमध्ये एका शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा होती. या शाळेत सगणाऊ शिकवत होत्या. मात्र, ही शाळा काही काळाने बंद पडली.
  • १८४८ - ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा काढली. यावेळी त्यांना समाजातील अनेक कर्मठ लोकांनी त्रास दिला. मात्र, त्यांनी न जुमानता ही शाळा सुरू ठेवली. त्या शाळेत शिकवायला जात होत्या त्यावेळी त्यांना शेण, दगड, माती फेकून मारले जात होते. मात्र, सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी त्यांचे शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले, अशाप्रकारे ब्रिटिशकालीन भारतात एका भारतीयांनी काढलेली ही मुलींची पहिलीच शाळा ठरली. त्यावेळी त्यांच्या शेण, दगड मारण्यात आले तरीही त्यावेळी त्यांच्या शाळेत जवळपास ४५ मुली शिकण्यासाठी आल्या होत्या. यावरून मुलींना त्याकाळी शिक्षणाची किती आवड होती? हे दिसून येते.
  • १८५२ - पुण्यातील शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले दाम्पत्याचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.
  • १८९६ - सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्री करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला होता.
  • समाजात बालहत्या, केशवपन अशा अनेक चालीरिती होत्या. मात्र, सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी त्याला कडाडून विरोध केला. ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. लैंगिक अत्याचाराला बळी पडून गरोदर असलेल्या महिलांचे, विधवांचे त्या बाळंतपण करीत होत्या. त्यामधून जन्माला आलेली मुले बालहत्या प्रतिबंधक गृहात पाठवली जात होती. याच ठिकाणी त्यांनी काशीबाई या विधवेचे मूल दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. यशवंत पुढे डॉक्टर झाला.
  • १८९७ - पुणे परिसरात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी सावित्रीबाईंनी आपल्या खांद्यावर उचलून रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. याच काळात त्यांचा दत्तक मुलगा यशवंतने देखील त्यांनी त्यांची खूप मदत केली होती. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना २० मार्च १८९७ लाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.
  • १९९५ - सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिवस हा 'बालिकादिन' म्हणून साजरा केला जातो.
  • २०१७ - त्यांच्या १८६ व्या जन्मदिवसानिमत्त विशेष गुगल डूडल प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादन केले होते.

सावित्रीबाईंनी केलेले लेखन - सावित्रीबाई या उत्तम लेखिका आणि कवयित्री देखील होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नायगाव या गावावर एक कविता प्रकाशित केली होती. यामध्ये त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला. इतकेच नाहीतर त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील अनेक चालीरिती, रुढी परंपरांवर कडाडून टीका केली होती. देवाकडे गेल्याने मुले होतात, अशी त्याकाळची भावना होती. त्यावेळी त्यांनी देवाकडे गेल्यावर मुले होतात, तर मग नवऱ्याचे काय काम, असा सवाल आपल्या लेखणीमधून मांडला होता.

सावित्रीबाईंनी लिहिलेले हे काही काव्यसंग्रह -

  • काव्यफुले (काव्यसंग्रह)
  • सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
  • सुबोध रत्नाकर
  • बावनकशी

Intro:Body:

savitribai phule

Conclusion:
Last Updated : Jan 3, 2020, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.