ETV Bharat / state

डेपोत 'कोविड रुग्णालय' उभारा... बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीची मागणी

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना सेवा देताना, मोठ्या संख्येने बेस्टचे कर्मचारी कोरोनाबाधित झाले. आतापर्यंत 54 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र, बेस्ट प्रशासनाकडून मृत्यूची आकडेवारी 9 दाखवण्यात आली आहे.

author img

By

Published : Jun 12, 2020, 7:14 PM IST

kovid-hospital-set-up-in-best-depot-demand-of-best-joint-workers-action-committee-in-mumbai
बेस्ट डेपोत 'कोविड रुग्णालय' उभारा...

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यातच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट बसचा वापर केला गेल्याने बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बेस्ट आगारात 'कोविड रुग्णालय' उभारावे या मुख्य मागणीसाठी आज ओशिवरा बस डेपो बाहेर बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती व बेस्ट कामगारांनी मूक निदर्शने केली. 13 जुलैपर्यंत मुंबईतील सर्व आगारात हे निदर्शने होणार असल्याची माहिती, संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.

बेस्ट डेपोत 'कोविड रुग्णालय' उभारा...

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना सेवा देताना, मोठ्या संख्येने बेस्टचे कर्मचारी कोरोनाबाधित झाले. आतापर्यंत 54 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र, बेस्ट प्रशासनाकडून मृत्यूची आकडेवारी 9 दाखवण्यात आली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचे किती कुटुंबीय कोरोनाबाधित झाले, किती जणांनी जीव गमवावा याची कोणती माहिती बेस्ट प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी द्यावी लागेल, विमा कवच द्यावे लागेल. यामुळे ही माहिती लपवली असल्याचा आरोप, बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.