मुंबई: चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या माजी संचालिका होत्या. त्यांचे पती दीपक कोचर देखील उच्च पदावर कार्यरत होते. दीपक कोचर तसेच व्हिडिओकॉन कंपनीचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांच्या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रामध्ये धक्कादायक माहिती उघड झालेली आहे. आयसीआयसीआय बँकेकडून वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या व्हिडिओकॉन कंपनी समूहाला दिलेले 1000 कोटी रुपये हे 'नॉन परफॉर्मिंग असेट्स' म्हणजेच बुडीत कर्ज म्हणून दाखवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांच्या खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी निश्चित केलेली आहे. या आरोपपत्राच्या आधारे उद्या उच्च न्यायालय कोणता निर्देश देते, याकडे लक्ष लागून राहिलेले होते; मात्र कोचर दाम्पत्याने स्वतंत्र सूट याचिका दाखल केल्यामुळे त्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरील लावलेला आरोप अमान्य केला. तसेच त्यांच्यावर दाखल केलेल्या आरोप पत्राबाबत त्यांना पूर्ण आकलन करून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जावी, म्हणून खटल्यामध्ये मुदत वाढ मागवून मिळण्याची विनंती केली.
बुडीत कर्जासाठी चंदा कोचर जबाबदार: सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडून चंदा कोचर आणि पती दीपक कोचर तसेच वेणू गोपाल धूत यांच्यावर आरोप ठेवलेला आहे. या संदर्भात विविध न्यायालयांमध्ये खटला सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याबाबत उद्या सुनावणी होणार आहे. जेव्हा एखाद्या बँक खातेदाराला कर्ज दिले जाते आणि तो दिलेले कर्ज परत देत नाही तेव्हाच त्याला 'नॉन परफॉर्मिंग असेट्स' असे म्हटले जाते. कर्जदाराच्या खात्यामध्ये तो आता ते कर्ज परत करण्याच्या आवाक्याचा बाहेर आहे; म्हणून त्याला बुडीत कर्ज म्हणतात आणि सामान्य जनता त्याला पैसे पाण्यात गेले, असे म्हणतो. याच प्रकारे चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणू गोपाल धूत यांच्यामुळे आयसीआयसीआय बँकेचे 1033 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांनी आरोप पत्रात नमूद केलेले आहे.
बेकायदेशीर कर्ज प्रकरण: वेणू गोपाल धूत प्रमुख असलेल्या व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला 300 कोटी रुपयांचे कर्ज बँकेच्या संचालक असताना चंदा कोचर यांनी 2009 मध्ये मंजूर केले होते. दरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन करून हे कर्ज दिले गेले. एकमेकांचे हितसंबंध राखण्यासाठी हे कर्ज दिल्या गेल्याचा आरोप केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केला आहे. तसेच सीबीआयने असे देखील नमूद केलेले आहे की, आयसीआयसीआय बँकेने जेव्हा चंदा कोचर या संचालिका होत्या त्या काळामध्ये व्हिडिओकॉन उद्योग समूहाला 1,875 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलेले आहे.
5 कोटीचे घर कवडीमोल भावात: सुमारे पाच कोटी रुपये किमतीपेक्षा अधिक रक्कम असलेल्या घराला केवळ 11 लाख रुपयांमध्ये चंदा कोचर यांना दिल्याचा आरोप आहे. व्हिडिओकॉन समूहाच्या मालकीच्या मुंबईतील मोठ्या चेंबर्समध्ये दीपक कोचर यांना फ्लॅट दिलाचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आरोप केलेला आहे. चंदा कोचर या संचालिका असताना त्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. नंतर हा फ्लॅट त्यांच्या कुटुंबाच्या सदस्य असलेल्या ट्रस्टकडे वळवण्यात आला. त्या ट्रस्टचे व्यवस्थापक, विश्वस्त हे दीपक कोचर होते.
आता न्यायालयाच्या निर्देशाकडे लक्ष: 'नॉन परफॉर्मिंग असेट्स' या व्याख्येमध्ये नोंदवले गेलेले पैसे बँकेने व्हिडिओकॉन उद्योग समूहाकडून वसूल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून आयसीआयसीआय बँकेला सुमारे 1033 कोटी रुपयांचा चुना लावल्याचा सीबीआयचा स्पष्ट आरोप कोचर दाम्पत्यावर आहे. पुढील दोन आठवड्यानंतर होणाऱ्या सुनावणीमध्ये न्यायालय कोणता निर्देश देते, ते स्पष्ट होईल.
हेही वाचा: