ETV Bharat / state

Former Mayor Kishori Pednekar : शिवसैनिकांना अडकविण्यासाठी कायदा सुव्यवस्था बिघडवली जातेय - किशोरी पेडणेकर - माजी महापौर किशोरी पेडणेकर

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर होतो. शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाला पालिकेने परवानगी दिलेली नाही. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल हे दबावाखाली खाली आहेत अशी टीका मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ( Mumbai Municipal corporation Election ) शिवसैनिकांना अडकवून ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी ( Sinde group try to disrupt law and order ) केला.

Kishori Pednekar
किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Sep 21, 2022, 4:20 PM IST

मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर होतो. शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाला पालिकेने परवानगी दिलेली नाही. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल हे दबावाखाली खाली आहेत अशी टीका मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ( Mumbai Municipal corporation Election ) शिवसैनिकांना अडकवून ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी ( Sinde group try to disrupt law and order ) केला.

कायदा, सुव्यवस्था बिघडावण्याचा प्रयत्न - शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून ( Thackeray and Shinde group ) शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर पालिकेने कोणताही निर्णय घेतला नसल्याने शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. यावेळी बोलताना, पालिका आयुक्त इकबाल चहल प्रेशर खाली आहेत. सदा सरवणकर हे आमदार म्हणून नव्हे तर विभाग प्रमुख म्हणून परवानगीसाठी अर्ज करत होते. पण कायदा आणि सुव्यवस्था बिघडली पाहिजे अशी स्थिती निर्माण केली ( Sinde group try to trap Shiv Sainik ) जातेय. येणा-या निवडणूकीत शिवसेनेचे चांगले चेहरे अडकवून ठेवले जावेत याकरता कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात आहे. शिवसैनिकांना उकसवण्याचे प्रयत्न होत आहेत. हे प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोखू ( Chief Minister Eknath Shinde) शकतात. मात्र भाजपाला हे करायचे नाही यामुळे जे होईल ते बघून घेवू. पण कोर्टावर आमचा विश्वास आहे, कोर्ट योग्य निर्णय घेईल असे पेडणेकर म्हणाल्या.

तेजस ठाकरेंचे पोस्टर्स लागले त्यात गैर काय - आज अनेक विषयांवर उद्धव ठाकरे बोलतील. मार्गदर्शन करतील. दसरा मेळाव्याबाबतही बोलतील. आमच्यापैकी अनेकजण तेजसप्रेमी आहेत. त्यामुळे पोस्टर लागले तर गैर काय? असा प्रश्न उपस्थित करता तेजस ठाकरेंना कधी राजकारणात आणयचं हे उद्धव ठाकरे ठरवतील तो त्यांचा अधिकार आहे असे पेडणेकर म्हणाल्या.

बाळासाहेबांचे नाव वापरून मोठे झालात - ज्या माणसाच्या हातच खाल्लं त्यांच्याच चारित्र्यावर आता शिंतोडे उडवले जातायत. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे नाव सतत घेतात यावरून टीका केली आहे. याबाबत बोलताना, बापाचं आईच नाव घेण चुकीचं आहे का? असा प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. तुमच्या बापाचं नाव घेऊन तर नाही लढले. तुम्ही देखील बाळासाहेबांचं नाव वापरून मोठे झालात असा टोला पेडणेकर यांनी कदम यांना लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.