ETV Bharat / state

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी किसान सभेचा मोर्चा मुंबईत धडकणार - दिल्ली शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन

केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातूनही पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज नाशिक ते मुंबई असा 15,000 शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी मोर्चा असून हा मोर्चा आज दुपारी मुंबईत दाखल होणार आहे.

मुंबई किसान सभा मोर्चा
मुंबई किसान सभा मोर्चा
author img

By

Published : Jan 24, 2021, 2:09 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातूनही पाठिंबा मिळत आहे. नाशिक येथून संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाही काढण्यात आला आहे. महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज नाशिक ते मुंबई असा 15,000 शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी मोर्चा असून हा मोर्चा आज दुपारी मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात हे सर्व मोर्चेकरी एकटवणार आहेत.

हेही वाचा - 'तर महाविकास आघाडीची ताकद कायम राहील, मंत्री ठाकुरांचा संजय राऊतांना टोला'

संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चा, आझाद मैदानात सभा

नाशिक येथून 23 जानेवारी रोजी सायंकाळी हा मोर्चा सुरू झाला. 24 तारखेला मोर्चा मुंबईत दाखल होईल. तसेच, दिनांक 25 जानेवारीला आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता प्रचंड सभा होणार आहे. या वेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाहित महाविकास आघाडीचे नेते पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असणार आहेत. 25 जानेवारीला संयुक्त शेतकरी मोर्चातर्फे राज्यपाल भवनावर जाऊन राज्यपालांना शेतकरी विरोधात असलेल्या कायदे रद्द करण्यात यावे, असे पत्र दिले जाईल.

राज्यभरातील 100 पेक्षा अधिक संघटना होणार सामील

राज्यभरातील 100 पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे.

हेही वाचा - ओबीसीचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मात्र परवानगीवरून संभ्रम कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.