ETV Bharat / state

उत्पन्नाची माहिती ईडीला द्यावीच लागणार, कोणीही कायद्याच्या वर नाही - किरीट सोमैया - CRITICISE OF SOMAYYA ON SARNAIK

भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईचे स्वागत करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व थेट ठाकरे परिवारावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारचे नेते बेनामी व्यवहार, भ्रष्टाचार कव्हर करण्यासाठी दबाव आणत आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

KIRIT SOMAYYA CRITICISE SHIVSENA
किरीट सोमय्या शिवसेना हल्लाबोल
author img

By

Published : Nov 25, 2020, 2:39 PM IST

मुंबई - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर व कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्यानंतर आता राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी सरनाईक यांच्यावरील कारवाईचे स्वागत करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे परिवारावर हल्लाबोल केला आहे.
प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या बेनामी असतील. त्यांचा कारभार व्यवस्थित नसेल. सरकारी पैसा किंवा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी वळवला असेल तर, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. सरनाईक यांच्याबद्दल मी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या,' असा दावाही सोमैया यांनी केला. ठाकरे सरकारचे नेते बेनामी व्यवहार, भ्रष्टाचार कव्हर करण्यासाठी दबाव आणत आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. "शिवसना नेते प्रताप सरनाईक यांना परकीय किंवा विदेशी मालमत्ता, घोटाळेबाजांशी संबंध, पारदर्शक नसलेल्या उत्पन्नाची माहिती ईडीला द्यावीच लागणार, कोणीही कायद्याच्या वर नाही" असेही किरीट सोमैया म्हणाले आहेत.

किरीट सोमैया शिवसेना हल्लाबोल

प्रकरण काय आहे?

मुंबईतील अंधेरी परिसरातील टॉप्स ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आल्यानंतर यासंदर्भात चौकशी केली जात होती. त्यावेळेस विहंग सरनाईक यास ताब्यात घेण्यात आले असता मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी तब्बल पाच तास विहंग सरनाईक यांची चौकशी केल्यानंतर त्यास घरी जाऊ सोडण्यात आले. यासंदर्भात प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया मिळाली असून मुंबई व महाराष्ट्राची कोणी बदनामी करत असेल तर, मी गप्प बसणार नाही, यापुढेही बोलत राहीन, ईडीची कारवाई सूडबुद्धीने झालेली असल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

हेही वाचा - एनडीएच्या आमदारांना खरेदी करण्याचा लालूंकडून प्रयत्न; सुशीलकुमार मोदींचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.