ठाणे - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील संशयित आणि वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ठाणे न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला. तसेच या प्रकरणी आता १९ मार्चला पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी शिवसेना, मुख्यमंत्री, आणि पोलीस आयुक्त यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच कळेल की त्यांचा ओसामा काय काय करीत होता. सचिन वझे हा बदमाश माणूस आहे. त्याला तत्काळ जेलमध्ये पाठवा, कोर्टाने जामीन नाकारला मग वाट कशाची बघता, असा सवाल उपस्थित करत सोमैया यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान वझे यांना शनिवारी उशिरा रात्री अटक करण्यात आली आहे.
सचिन वझे यांच्या सोबत आर्थिक संबंध-
सचिन वझे यांचा अटक पूर्व जामीन शनिवारी न्यायालयाने फेटाळला. मात्र शिवसेनेने सचिन वाझे याला संरक्षण दिले हे आम्हाला पटत नाही. दुसरीकडे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एक नेता व सचिन वझे यांचे आर्थिक संबंध होते, असा आरोपही सोमय्या यांनी केला. हिरेन कुटुंबीयांच्या मनात एकच खेद आहे. आमचा माणूस गेला, मात्र आरोपीवर कारवाई का होत नाही? ही खंत सोमैया यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भूमिका संशयास्पद-
मनसुख आणि सचिन वझे यांचे चांगले संबंध होते. म्हणून उद्धव ठाकरे यांनी हत्या करण्याचे लायसन्स वझे यांना दिले आहे काय? मनसुख हत्येचा तपास एटीएस करणार असल्याचा फतवा मुख्यमंत्र्यांनी काढला. मुख्यमंत्र्यांनी पदाच मान ठेवला नाही. तर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही पदाचा मान ठेवला नाही, एका एपीआय अधिकाऱ्याला तासंतास घेऊन चर्चा काय करतात, तेव्हा पोलीस आयुक्तांनाही जाब विचारला पाहिजे. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त दोघांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोपही सोमैया यांनी केला.
परमबीर सिंह पदाचा मान ठेवत नाहीत-
मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह हे आपल्या पदाचा मान न ठेवता वारंवार सचिन वझे यांना का भेटतात? हा मोठा प्रश्न आहे. मनसुखच्या हत्येचे लायसन्स यांना कोणी दिला असा सवाल करत सोमैया यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना ही टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांचा हेतु चुकीचा-
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे देणे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हेतूच चुकीचा होता. सचिन वझे शिवसेनेचा प्रवक्ता होता, ते त्याला वाचवण्याचे प्रत्यन करत होते, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला.