ETV Bharat / state

'ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामासंबंधी पुढची कारवाई कधी?' - म्हाडा लेटेस्ट न्यूज

मंत्री अनिल परब यांनी आपल्या वांद्रे येथील कार्यालयाजवळ अनधिकृत बांधकाम केल्याचे एका व्यक्तीने म्हाडाच्या निदर्शनास आणून दिले होते. परब यांच्या अनधिकृत बांधकामावर 13 फेब्रुवारी रोजी म्हाडाने कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, नंतर पुढे कोणतीही हालचाल दिसत नाही, असे म्हणत भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आज पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.

भाजप नेते किरीट सोमैया पत्रकार परिषद
भाजप नेते किरीट सोमैया पत्रकार परिषद
author img

By

Published : Oct 7, 2020, 6:18 PM IST

मुंबई - 'महाविकास आघाडीतील शिवसेना मंत्री अनिल परब यांचे कार्यालयच बेकायदेशीरपणे बांधकामाबाबत म्हाडाने २०१९मध्ये त्यांना नोटीस बजावली. तरीही अद्याप अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलेले नाही. शिवसेनेचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे असतात काय? ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामासंबंधी पुढची कारवाई कधी होणार', असा प्रश्न भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आज उपस्थित केला आहे.

अनिल परब यांनी आपल्या वांद्रे येथील कार्यालयाजवळ अनाधिकृत बांधकाम केल्याचे एका व्यक्तीने म्हाडाच्या निदर्शनास आणून दिले होते. परब यांच्या अनधिकृत बांधकामावर 13 फेब्रुवारी रोजी म्हाडाने कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, नंतर पुढे कोणतीही हालचाल दिसत नाही, असे म्हणत किरीट सोमैया यांनी आज पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा - नियम मोडणाऱ्यांना कराड पोलिसांचा दणका; महिन्यात २८ लाखांचा दंड वसूल

'मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) मुंबई यांनी 27 जून 2019 व 22 जुलै 2019 अशा दोन नोटिसांद्वारे परब यांना आदेश पाठवले होते. त्यांनी गांधीनगर, वांद्रे पूर्व, मुंबई येथील इमारत क्र. 57 व 58 च्या मधल्या मोकळ्या जागेत बेकायदेशीर बांधकाम केले होते. ते ताबडतोब पाडण्यासंबंधीचे आदेश त्यांना त्या नोटिशीत देण्यात आले होते. या संबंधात मी माहितीच्या अधिकारांतर्गत व अन्य संपर्कातून काही पुरावे कागदपत्र प्राप्त केले आहे. याच्याअंतर्गत 21 जून 2019 रोजी म्हाडाचे अभियंत्यांनी म्हाडाच्या मुख्य व्यवस्थापकांना अहवाल दिला. त्यात सर्व काही स्पष्ट शब्दांत सांगितले आहे,' असे किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

'गांधीनगर इमारत क्र. 57 व 58 या दोन इमारतींच्या मधील मोकळ्या जागेत केलेले बेकायदेशीर बांधकाम केले असल्याचे निदर्शनास आले.' हा अहवाल प्रमोद बनगर या म्हाडाच्या अधिकाऱ्याने 21 जूनला म्हाडाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना दिला. त्यानंतर म्हाडाचे संबंधित अधिकारी यांनी 14 ऑगस्ट 2019 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना एक आदेश दिला व पोलिसांची मदत घेऊन आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री घेऊन व्यवस्था करून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले. तरीही अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही,' असे सोमैया यांनी म्हटले आहे.

'परब यांच्या संबंधात काही दिवसांपूर्वी मी वांद्रे पूर्व पोलीस स्टेशन व म्हाडा येथे अधिकृत तक्रार ही केलेली आहे. मंत्री अनिल परब यांना याबाबत पत्र पाठवले आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामासंबंधी गप्प का आहेत', असा प्रश्न विचारत सोमैया यांनी, परब यांच्या बांधकामावर आणि अनधिकृत बांधकाम केले म्हणून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमैया यांनी केली.

हेही वाचा - "कोविड रुग्णांच्या उपचारांना प्राधान्य, उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होणार"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.