ETV Bharat / state

Kirit Somaiya on Sanjay Raut : कोर्टात अपील करताना संजय राऊत २ हजार कोटींच्या दाव्याचा उल्लेख करणार का? किरीट सोमैय्यांचा सवाल

खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांच्या या आरोपाने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. कोर्टात अपील करताना हा आरोप उद्धव ठाकरे व संजय राऊत करणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

author img

By

Published : Feb 19, 2023, 1:30 PM IST

Kirit Somaiya on Sanjay Raut
Etv Bharatसंजय राऊत २ हजार कोटींच्या दाव्याचा उल्लेख करणार का ?

मुंबई : शिवसेना हे नाव व धनुष्यबाण या निशाणीसाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याची माहिती, शिवसेना खासदार, नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. परंतू संजय राऊत यांच्या या दाव्यावर भाजप नेते किरीट सोमैया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. किरीट सोमैय्या म्हणतात की, संजय राऊत सांगतात, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निशाणीसाठी रुपये २ हजार कोटींचा सौदा झाला. परंतु उद्धव ठाकरे साहेब, जे आपण आणि संजय राऊत कोर्टात अपील करणार आहात, त्यात हा आरोप आपण करणार ना ? असा प्रश्न किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे.

ठाकरे गटात मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता : तेलही गेले, तूपही गेले, हाथी राहिले धोपाटणे, अशा म्हणी प्रमाणे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे असलेले शिवसेना हे पक्षाचे नाव, व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे यांच्या गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी तर आहेच परंतु यावरून आरोप - प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत.

काय म्हणाले आहेत, संजय राऊत? : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय घेतला. यातून सावरण्यासाठी त्यांना आता बराच अवधी जाणार आहे. परंतु या दरम्यान आरोप - प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. निवडणूक आयोगाने हा निर्णय देताना पक्षपातीपणा केल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचा सौदा आणि व्यवहार झाले असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. इतकेच नाही तर याबाबत माझी खात्रीची माहिती असल्याचही त्यांनी म्हटले आहे. तसेच हा प्राथमिक आकडा असून हे शंभर टक्के सत्य असल्याचही ते म्हणाले आहेत. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील, देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं, असंही राऊत यांनी म्हटले आहे.

आरोप - प्रत्यारोप शिगेला? : संजय राऊत यांनी नक्की कशाचा आधारावर हा दावा केला आहे आणि या दाव्यामध्ये कितपत सत्यता आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र सध्या तरी राऊत यांनी टाकलेल्या या राजकीय बॉम्बने चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत हे सातत्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेची बाजू सातत्याने लावून धरत आले आहेत. मागील साडेतीन वर्षात त्यांनी अनेकदा शिवसेनेला वाईट परिस्थितीतून उभारी देण्याचे काम केले आहे. परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटाची पायाखालची वाळू सरकली असून त्या कारणाने मोठ्या प्रमाणात आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पण या सर्व दाव्यात किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल.

हेही वाचा : Shiv Jayanti 2023: पुढील वर्षी कोणत्याही शिवसैनिकांची अडवणूक होणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संजय राऊत २ हजार कोटींच्या दाव्याचा उल्लेख करणार का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.