ETV Bharat / state

Kirit Somaiya On Uddhav Thackeray : 'ठाकरे-वायकर यांच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा' - Mahal Pictures Private Limited

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केली आहे. वायकर यांनी महापालिकेचा भूखंड लाटून त्यावर हॉटेल बांधकाम सुरू केले असून हा 500 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Somaiya On Uddhav Thackeray
Somaiya On Uddhav Thackeray
author img

By

Published : Mar 4, 2023, 6:33 PM IST

ठाकरे-वायकर यांच्या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा - सोमय्या

मुंबई : माजी मंत्री, शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँकवेटच्या नावाने शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. अनेक वर्ष सामान्य नागरिकांसाठी क्रीडांगण राखीव ठेवायचे होते. त्यावर मातोश्री क्लबच्या सुप्रीमो बँक्वेट नावाने रीतसर बँक्वेट हॉल असे उद्योग सुरू आहेत. आता मुंबई महापालिकेच्या आकत्यारीतील खुले क्रीडांगण, उद्यानासाठी असलेल्या जागेवर वारकऱ्यांनी अनधिकृत कब्जा करून दोन लाख चौरस फुटाच्या पंचतारांकित हॉटेल बांधकामाला सुरुवात केली आहे. या हॉटेलची किंमत 500 कोटी रुपये असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

महल पिक्चर्सकडून घेतला जागेचा ताबा : वायकर यांनी ही जागा महल पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच सध्याचे या जागेचे मालक अविनाश भोसले शाहीर बलवा, विनोद गोयंका यांच्याकडून ताबा घेतला आहे. या जमीनीचे मुल्या चार कोटी असतांना फक्त तीन लाखत खरेदी करण्यात आली आहे.

जमीन बळकवल्याचा आरोप : या जागे पैकी 67% जागा ही मुंबई महापालिकेच्या ताब्यात जनसामान्यांच्या आरक्षण असलेल्या क्रीडांगण आणि उद्यानासाठी घोषित करण्यात आली. मात्र, वायकर यांनी या जमिनीवर वीस वर्षांपासून कब्जा करून तिचा वापर लग्न समारंभासाठी केला. ही जागा कधीच महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली नाही. 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त चहल यांनी वायकर यांनी या जागेवर आपला कब्जा दाखवला. तिथे दोन लाख चौरस फुटाच्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाला मंजुरी मिळवली. वायकर यांनी लगेचच बांधकाम सुरू करून ज्या जमिनीवर त्यांचा अधिकार नाही ती जमीन बळकावली आहे.

महापालिकेने खुलासा मागवला : या संदर्भात आपण 2021 मध्येच हरकत घेतली होती. या घोटाळ्याचा पाठपुरावा आपण गेली दोन वर्ष करीत आहोत. मुंबई महापालिकेने आता 8 फेब्रुवारी 2023 रोजी रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे. आपण गैर कायदेशीर कब्जा घेऊन महापालिका, शासनाची फसवणूक करून पंचतारांकित हॉटेल बांधत असल्याबाबत खुलासा मागवला असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

एसआयटीमार्फत चौकशी व्हावी : सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या या घोटाळ्याची आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी असे आपण त्यांना पत्र पाठवले आहे तसेच या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, तसेच सदर जागेवर काम थांबवण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी ही आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
तो कर्मचाऱ्यांचा अपहार

सोमय्या यांच्या ट्रस्टमध्ये अपहार : किरीट सोमय्या यांच्या ट्रस्टमध्ये श्रवण यंत्रांमध्ये अपहार झाल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात विचारले असता किरीट सोमय्या म्हणाले की, ती किरकोळ बाब आहे. दोन कर्मचाऱ्यांनी केलेला अपहार असून त्या संदर्भात आम्ही पोलिसांना कळविले आहे.

हेही वाचा - Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कांद्याला मिळणार 'इतके' अनुदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.