ETV Bharat / state

KCR Maharashtra Visit : केसीआर सोलापुरात दाखल; हजारो वाहनांच्या ताफ्यासह एन्ट्री - तेलंगणा मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्र दौरा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून ते पंढपुरात विठ्ठल मंदिराला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. केसीआर हे सोमवारी सोलापुरात दाखल होणार आहेत. मंगळवारी ते पंढपूरला जाणार आहेत.

KCR  Maharashtra visit update
केसीआर पंढरपुर दौरा
author img

By

Published : Jun 26, 2023, 9:23 AM IST

Updated : Jun 26, 2023, 7:43 PM IST

केसीआर यांचा महाराष्ट्र दौरा

सोलापूर: बीआरएस पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर सोमवारी (२६) हैदराबाद येथील प्रगती भवन येथून सोलापूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्यासोबत अनेक मंत्री, खासदार, आमदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या ताफ्यात सुमारे ६०० वाहने असणार आहेत.

दौऱ्याची जय्यत तयारी - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या लवाजम्यासह आज सायंकाळी २६ जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. हेलिकॉप्टरमार्गे होटगी रोड विमानतळावर उतरणार होते. परंतु, ऐनवेळी त्यांच्या या नियोजनात बदल झाला आहे. केसीआर हे आपल्या फौजफाट्यासह बाय रोडने हैदराबाद- उमरगामार्गे ते सोलापुरात येण्याची शक्यता आहे. केसीआर यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव केटीआर आणि जावई तथा तेलंगणचे अर्थमंत्री हरीश राव देखील सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. केसीआर यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोलापुरातील अनेक हॉटेल्स व लॉजची बुकिंग फुल्ल झाली आहे.

KCR
केसीआर यांचा महाराष्ट्र दौरा

आयोजित सभेला मुख्यमंत्री केसीआर करणार: दुपारी एक वाजता उमरगा शहरातील मिडवे येथे जेवण करणार आहेत. तेथून सोलापूर गाठून रात्रीचा मुक्काम करणार आहेत. सीएम केसीआर आणि इतर लोकप्रतिनिधी मंगळवारी (27 ) सकाळी 8 वाजता पंढरपूरला निघणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सकाळी ९.३० वाजता भेट देणार आहेत. तेथून सकाळी 11.30 वाजता पंढरीपूर येथे सरकोली गावात पोहोचणार आहे. तेथे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते भगीरथ भालके यांच्यासह अनेक नेते बीआरएसमध्ये सामील होणार आहेत. यावेळी आयोजित सभेला मुख्यमंत्री केसीआर संबोधित करणार आहेत

KCR
केसीआर यांचा महाराष्ट्र दौरा

तुळजा भवानी देवीचे दर्शन घेणार: तेथे जेवण उरकून ते दुपारी दीड वाजता हैदराबादला परतणार आहे. मार्गात सीएम केसीआर आणि इतर लोकप्रतिनिधी दुपारी 3.30 वाजता धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील प्रसिद्ध शक्तीपीठ 'तुळजा भवानी' देवीचे दर्शन घेणार आहेत. दुपारी साडेचार वाजता निघून 10 वाजता हैदराबादमधील प्रगती भवनात पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्या प्रमाणे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. केसीआर यांच्या दौऱ्यात आमदार बाळका सुमन, पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष, माजी मंत्री वेणुगोपाल चारी, बीआरएस किसान सेलचे अध्यक्ष माणिक कदम आदी नियोजन करणार आहेत.

केसीआर सोलापुरातील उद्योजकांशी संवाद साधणार: केसीआर हे सोलापुरात येणार असल्याने अनेक उद्योजक त्यांची दोन दिवसांपासून वाट पाहणार आहेत. सोमवारी रात्री हॉटल बालाजी सरोवर या पंच तारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. मुक्कामा दरम्यान रात्री केसीआर सोलापुरातील उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. विमानसेवा अन् उद्योगवाढीवर सोलापूरकरांशी संवाद साधणार आहेत. एकीकडे काँग्रेस सोलापुरात वज्रमूठ घट्ट करत असताना केसीआर यांनी सोलापुरात पाय रोवायला सुरुवात केली आहे. केसीआर हे सोलापुरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुरुंग लावत असल्याच चर्चा आहे.

तीनशे जणांचा ताफा सोलापूर व पंढरपुरात-केसीआर व त्यांचे मंत्रिमंडळ मंगळवारी सकाळी पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. केसीआर व तेलंगणातील मंत्रिमंडळ, आमदार अन् पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अशा एकूण तीनशे लोकांचा ताफा सोलापूर व पंढरपूर येथे येत असल्याने सोलापुरातील राजकrय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दीडशेहून अधिक गाड्यांचा ताफा केसीआर यांच्या सोबत आहे. तसेच त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यांचे काही सुरक्षा एजन्सी प्रमुख सोलापुरात दाखल झाले आहेत. सोलापुरातील हॉटेल परिसरात रविवारी रात्रीपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

केसीआर घेणार तुळजाभवानीचे दर्शन - सोमवारी रात्री सोलापुरात मुक्काम केल्यानंतर केसीआर मंगळवारी सकाळी पंढरपूर येथील श्री विठ्ठल व रुक्मिणी देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. विठ्ठल दर्शनानंतर केसीआर हे भगीरथ भालकेंच्या घरी जाणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील सरकोलीमध्ये केसीआर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या शेतकरी मेळाव्यात भगीरथ भालके राष्ट्रवादीला रामराम ठोकून बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.पंढरपूर दौरा आटोपून केसीआर व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री व नेते तुळजापूर दर्शनासाठी जाणार आहेत. मंगळवारी दुपारी तुळजाभवानी मातेचे दर्शन ते घेऊन ते हैदराबादकडे रवाना होणार आहेत.

सोलापुरातील हॉटेल्स व लॉज फुल्ल- दोनशे दहा खोल्यांची बुकिंग- सोलापुरातील हॉटेल्स व लॉज फुल्ल बुक झाले आहेत. तेलंगणा राज्याचे मंत्री, आमदार तसेच टीआरएस पक्षाचे नेते सोमवार पासून सोलापूर दौऱ्यावर आहेत. या सर्वांचा रात्री सोलापुरात मुक्काम आहे. सोलापुरातील दोनशे दहा खोल्या बुक केल्याची माहिती पक्षाच्या कार्यकत्यांनी दिली आहे. आसरा चौक येथील बालाजी सरोवर या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पन्नास रुम्स, होटगी रस्त्यावरील दोन हॉटेलमध्ये पंचवीस खोल्या, सात रस्ता येथील एका हॉटेलमध्ये पंधरा खोल्या, पांजरापोळ चौकातील एका हॉटेलमध्ये पंचवीस खोल्या, मुरारजी पेठेतील एक हॉटेलमध्ये पंचवीस खोल्या रविवारी रात्री ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-

  1. KCR Pandharpur Maharashtra visit update : असा असेल तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पंढरपूर दौरा, भगीरथ भालके करणार प्रवेश
  2. Devendra Fadnavis on KCR : केसीआर येणार विठ्ठलाच्या दर्शनाला; फडणवीस म्हणाले, भक्तीभावाने या, पण...

Last Updated : Jun 26, 2023, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.