ETV Bharat / state

CM Siddaramaiah Letter : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी लिहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र - release of water from Krishna River

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात वारणा/कोयना जलाशयातून कृष्णा नदीत 2.00 टीएमसी तसेच उजनी जलाशयातून भीमा नदीत 3.00 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे.

CM Siddaramaiah Letter
CM Siddaramaiah Letter
author img

By

Published : May 31, 2023, 4:06 PM IST

Updated : May 31, 2023, 4:22 PM IST

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वारणा, कोयना जलाशयातून कृष्णा नदीत 2.00 टीएमसी आणि उजनी जलाशयातून भीमा नदीत 3.00 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. कर्नाटकात पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सोडण्याचे निर्देश द्यावेत असेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.

तातडीने पाणी सोडण्याची मागणी : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटकातील मानव आणि पशुधन या दोघांच्या पिण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृष्णा नदी आणि भीमा नदीतून पाणी सोडण्याची विनंती केली आहे. वारणा, कोयना जलाशयातून कृष्णा नदीत 2.00 टीएमसी, उजनी जलाशयातून 3.00 टीएमसी पाणी भीमा नदीत तातडीने सोडण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सुचना द्याव्यात असे देखीलम मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. हीच विनंती भाजपच्या बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने उन्हाळ्यात केली होती.

कर्नाटकात पिण्याचाया पाण्याची तीव्र समस्या : वारणा/कोयना जलाशयातून कृष्णा नदीत 3.00 टीएमसी तसेच उजनी जलाशयातून भीमा नदीत 3.00 टीएमसी पाणी मानव तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाणी समस्या सोडण्याची विनंती केली आहे. मे २०२३ च्या पहिल्या पंधरवड्यात कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.

कर्नाटकाच्या काही जिल्ह्यात कडक उन्हाळा : कर्नाटकातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अजूनही कडक उन्हाळ्याची परिस्थिती आहे. नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. तसेच पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याच्या समस्येने रुद्र रुप धारण केले आहे. नागरिकांना घरगुती तसेच वापरासाठी पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने पाण्याच्या समस्येकडे लक्ष देऊन, पाण्याचा प्रश्न मार्गी लालावा असे सुद्धरमय्या यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडे विनंती केली आहे. उत्तर कर्नाटकात अद्याप मान्सून सक्रिय झालेला नसुन आणखी काही दिवस पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्याता दिसत नाही. मान्सून सक्रिय झाल्यास काही प्रमाणात कर्नाटकातील जनतेला तसेच पशुधनाला दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा -

Draining Water For Phone : व्वा रे पठ्ठ्या . . सेल्फी घेताना मोबाईल पडला तलावात, अधिकाऱ्याने फोनसाठी तलाव केला रिकामा

Last Updated : May 31, 2023, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.