मुंबई - बॉलीवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना राणावत हिचा आज ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. कंगनाने तिच्या वाढदिवसाला 'थलायवी' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. मुंबईनंतर कंगना थलायवी चा ट्रेलर लाॅन्च करण्यासाठी चेन्नईला गेली होती. या वेळेस तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभव चाहत्यांसोबत शेयर केला.
कंगना राणावतने बॉलीवुड अणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करण्यातील फरक सांगितला. कंगनाने सांगितले की की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नेपोटिज्म आहे, मात्र ग्रुपिजम नाही. येथे नवेदित अभिनेत्यांना दूर केले जात नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे कौतुक करताना येथील लोक कठोर मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर पुढे आले आहेत. कोणीही कोणाविषयी वाईट बोलत नाही.
हेही वाचा - मुंबई पोलीस दलात मोठी उलथापालथ; तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी बदल्या
आत्मसन्मानासाठी बोलले
कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर केलेल्या व्हिडीयोमध्ये तिने मुख्यमंत्र्यांना तू तडक असे म्हटले होते. तिने एएनआयशी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझ्या आयुष्यात आातापर्यंत जेवढ्या गोष्टी घडल्या, त्यावरून त्या रियल लाईफमध्येच घडल्यासारखे वाटते. तुम्ही इतिहासात डोकावून पाहिल्यास जो पुरूष स्त्रीचा अपमान करतो, त्याची अधोगती निश्चीतच आहे. रावणाने सीतेचा अपमान केला होता. कौरवांनी द्रौपदीचे हरण केले. वरील घटनांसारखे माझ्या आयुष्यात असे काही घडले नाही.मी सुध्दा एक महिलाच आहे.मी स्वत:च्या स्वाभिमानासाठी विधाने केली.कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी माझ्या आत्मसन्मानासाठी व्हिडीयो रेकॉर्ड केला.जो कोणी पुरूष महिलेचा अपमान करतो, त्याचा केवळ सत्यानाशच होतो. असेच मला वाटते.