मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या दररोज एक ट्विट करून खळबळ उडवून देत आहे. काल शिवसेना आपल्याला मुंबईत येऊ नकोस अशी धमकी देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आज तिने अमुक-अमुक तारखेला आपण मुंबईत येत असून ज्याच्यात हिम्मत असेल त्याने आपल्याला रोखून दाखवावं, असे म्हणत शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.
-
I see many people are threatening me to not come back to Mumbai so I have now decided to travel to Mumbai this coming week on 9th September, I will post the time when I land at the Mumbai airport, kisi ke baap mein himmat hai toh rok le 🙂 https://t.co/9706wS2qEd
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I see many people are threatening me to not come back to Mumbai so I have now decided to travel to Mumbai this coming week on 9th September, I will post the time when I land at the Mumbai airport, kisi ke baap mein himmat hai toh rok le 🙂 https://t.co/9706wS2qEd
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020I see many people are threatening me to not come back to Mumbai so I have now decided to travel to Mumbai this coming week on 9th September, I will post the time when I land at the Mumbai airport, kisi ke baap mein himmat hai toh rok le 🙂 https://t.co/9706wS2qEd
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात दररोज खळबळजनक खुलासे करणाऱ्या कंगणाने यावेळी शिवसेनेला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काल शिवसेना नेते संजय राऊत आपल्याला मुंबईत पाय ठेवून नकोस सांगत धमकावत असल्याचं ट्विट तिने केलं होतं. याच ट्विटमध्ये तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. मात्र, आज यापुढे जाऊन या तारखेला आपण मुंबईत येत असून शक्य असेल तर आपल्याला रोखून दाखवावं अस सांगत शिवसेनेला उघड उघड आव्हान दिले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाला आव्हान देऊन कंगणाला नक्की काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न आता पडायला लागला आहे.
एकीकडे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबीने आता अटकसत्र सुरू केले आहे. त्यामुळे सुशांतने केलेल्या आत्महत्येमागील वेगळी करणं आता समोर यायला लागली आहेत. अशात कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगवून नक्की कोणत्या गोष्टीवरून माध्यमांचा लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे.
हेही वाचा - मी पोकळ धमक्या देत नाहीतर थेट अॅक्शन करतो, संजय राऊतांचे कंगणाला शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर