ETV Bharat / state

दूध भेसळी विरोधात दुग्ध विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाची एकत्र मोहीम - दूध भेसळ महाराष्ट्र

राज्यात भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होतो. दूध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांना दूध विक्री हा जोड धंदा किफायतशीर ठरणार असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Aug 12, 2020, 5:06 PM IST

मुंबई - राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर दुधात होणाऱ्या भेसळी विरोधात दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कारवाई करणार असून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून प्रमाणित नसलेल्या दुधात निळ टाकण्याचे निर्देश पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज दिले आहेत.

मंत्रालयातील दालनात दूध भेसळ रोखण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरीता आयोजित बैठकीत ते बोलत होते. केदार म्हणाले, दुधातील होणारी भेसळ रोखण्याकरीता दुधाचे नमुने तपासण्याकरीता मी स्वत: मराठवाडा विभागात जाणार असून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे नमुने तपासण्याकरीता जाणार आहेत. तसेच मुंबईसह ठाणे या भागात दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त हे दुधाचे नमुने तपासून दोंषीवर कारवाई करणार आहेत, असे केदार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट झाली असून हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्टांन्न निर्मीत केंद्र मोठ्याप्रमाणात बंद झाली आहेत. परिणामी राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांकडे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न शासनाने दुध भुकटीच्या स्वरुपात सोडवला. तसेच दुधाची मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखण्याकरीता दुग्ध व्यवसाय विभागाने दक्ष राहावे, असे केदार यांनी सांगितले.

राज्यात भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होतो. दूध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांना दूध विक्री हा जोड धंदा किफायतशीर ठरणार असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी दूध भेसळ हा विषय दम बिर्याणी हाताळावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दुग्ध व्यवसाय विभाग आणि अन्न औषध प्रशासन या विभागांद्वारे दूध भेसळ रोखण्याकरीता शासनाकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल व्हॅन अद्ययावत करावे. त्यासाठी लागणारे रसायन तत्काळ उपलब्ध करावे. तत्रंज्ञ व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले, दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. भविष्यात दूध भेसळ करण्याचे धाडस करणार नाहीत, अशी कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त सुमंत भांगे, अन्न व औषध विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे, दुग्ध व्यवसाय विभागाचे उपायुक्त एस.आर. सिरपूडकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.