मुंबई - राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राज्यातील अनेक बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पन्नास वर्षे कधीही बँकेचे संबंध न ठेवलेल्या शरद पवार यांचा या प्रकरणाशी संबंध जोडला जतो, हे आश्चर्य आहे. अस्वस्थ झालेले भाजपच ईडीचा गैरवापर करत आहे. जनता दुधखुळी नाही, असे मत राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा- शिखर बँक घोटाळा: ईडीकडून शरद पवार, अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याप्रकरणी ट्वीट करत अपाली प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "परवा फडणवीस म्हणतात पवारांना संपवणार आणि आज ईडी पवारांवर केस दाखल करते. याचा अर्थ कळतो काय तुला महाराष्ट्रा?" तर काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही एक ट्विट केले असून या ट्विट मध्ये त्यांनी " ईडी झालीय येडी, मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय." अशी प्रितिक्रिया दिली आहे
हेही वाचा- काय आहे शिखर बँक घोटाळा?