मुंबई Jitendra Awhad Controversy : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी शिर्डी इथं पक्षाच्या शिबिरात भगवान श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं होतं. आव्हाडांच्या या वक्तव्याविरोधात अजित पवार गट तसंच भाजपा आक्रमक होत आहे. दुसरीकडं आव्हाड यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातूनच विरोध होत असल्याचं दिसतंय. जितेंद्र आव्हाड यांनी रामाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन उत्तर देत घरचा आहेर दिलाय. राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्मावर बोलणं सोडलं पाहिजे. देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना असल्याचंही रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
-
साडे तीन जिल्ह्याच्या जिल्हेहिलाईचा मुंब्रा स्थित मानसपुत्र हिंदुद्वेषी जितुद्दीन!!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 3, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
कधी काळी प्रभु रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारा आज त्यांचं अस्तित्व सांगतोय आणि आता तर चक्क खोटे रामायणाचे धडे देऊ लागलाय.
संकष्टी चतुर्थीला मटणाचे खांड चघळणाऱ्या भांड स्वयंघोषित… pic.twitter.com/rW8yNy5Xx6
">साडे तीन जिल्ह्याच्या जिल्हेहिलाईचा मुंब्रा स्थित मानसपुत्र हिंदुद्वेषी जितुद्दीन!!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 3, 2024
कधी काळी प्रभु रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारा आज त्यांचं अस्तित्व सांगतोय आणि आता तर चक्क खोटे रामायणाचे धडे देऊ लागलाय.
संकष्टी चतुर्थीला मटणाचे खांड चघळणाऱ्या भांड स्वयंघोषित… pic.twitter.com/rW8yNy5Xx6साडे तीन जिल्ह्याच्या जिल्हेहिलाईचा मुंब्रा स्थित मानसपुत्र हिंदुद्वेषी जितुद्दीन!!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 3, 2024
कधी काळी प्रभु रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारा आज त्यांचं अस्तित्व सांगतोय आणि आता तर चक्क खोटे रामायणाचे धडे देऊ लागलाय.
संकष्टी चतुर्थीला मटणाचे खांड चघळणाऱ्या भांड स्वयंघोषित… pic.twitter.com/rW8yNy5Xx6
अजित पवार गट आक्रमक : आव्हाडांच्या त्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. जितेंद्र आव्हाडांच्याविरोधात ठाण्यात अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालाय. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर महाआरती करण्याचा प्रयत्न केला. महाआरती करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी अजित पवार गटाचे केवळ चार पदाधिकारी उपस्थित होते, असं ट्विट खुद्द जितेंद्र आव्हाड यांनीच केलंय. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आलीय. तसंच गुन्हा दाखल न झाल्यास ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात महाआरती करण्याचा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिलाय.
-
उद्या सकाळी 9.30 वाजता
— Ram Kadam (@ramkadam) January 3, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आम्ही सर्व प्रभू रामचंद्रा चे भक्तगण
शरद पवार गटाचे नेता आव्हाड यांच्या विरोधात FIr करण्यास जाणार ..
घाटकोपर चिराग नगर पोलीस स्टेशन
आमदार राम कदम
भाजपा प्रवक्ता
">उद्या सकाळी 9.30 वाजता
— Ram Kadam (@ramkadam) January 3, 2024
आम्ही सर्व प्रभू रामचंद्रा चे भक्तगण
शरद पवार गटाचे नेता आव्हाड यांच्या विरोधात FIr करण्यास जाणार ..
घाटकोपर चिराग नगर पोलीस स्टेशन
आमदार राम कदम
भाजपा प्रवक्ताउद्या सकाळी 9.30 वाजता
— Ram Kadam (@ramkadam) January 3, 2024
आम्ही सर्व प्रभू रामचंद्रा चे भक्तगण
शरद पवार गटाचे नेता आव्हाड यांच्या विरोधात FIr करण्यास जाणार ..
घाटकोपर चिराग नगर पोलीस स्टेशन
आमदार राम कदम
भाजपा प्रवक्ता
भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वक्तव्यावरुन भाजपाही आक्रमक झालीय. भाजपा आमदार राम कदम आज घाटकोपर येथील चिराग नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिलीय. तसंच 'कधी काळी प्रभु रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारा आज त्यांचं अस्तित्व सांगतोय. आता तर चक्क खोटे रामायणाचे धडे देऊ लागलाय. संकष्टी चतुर्थीला मटणाचं खांड चघळणाऱ्या भांड स्वयंघोषित नेत्याला सकल हिंदू समाज जागा दाखवणार', असं ट्विट भाजपाच्या वतीनं करत आव्हाडांना इशारा देण्यात आलाय.
-
आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2024आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2024
हेही वाचा :