मुंबई - आपल्या शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असतानाही या सरकारने कांदा आयात केला आहे. इजिप्तचा कांदा मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आला असून, २० रुपये किलोने विकला जात आहे. हे सरकार बेशरम असून, शेतकऱ्यांनी विचार आणि अभ्यास करुनच मतदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.
हेही वाचा - विधानसभेचे धुमशान.. ३,२३७ उमेदवारांपैकी महिला केवळ २३५ तर वयाची ८० पार केलेले चार उमेदवार रिंगणात
परदेशातून कांदा आपल्याकडे येणे हे काही आत्ता नवीन नाही. या पूर्वीही अनेकदा बाजारात इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या ठिकाणांहून कांद्याची आवक झाली आहे. मात्र, आपल्या देशातील शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक असताना परदेशातून कांदा आयात करणे हे चुकीचे धोरण असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसून शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मतदान करावे असे आव्हाड म्हणाले.