ETV Bharat / state

'ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी यापूर्वीच केली, आता कोणीही फुटणार नाही' - गद्दारी करणारांनी यापूर्वीच केली - आव्हाड

महाराष्ट्र हा भाजपसाठी आता खरेदी-विक्रीचा संघ नाही. ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी यापूर्वीच केली असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा
author img

By

Published : Nov 10, 2019, 5:20 PM IST

Updated : Nov 10, 2019, 5:34 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात आता कोणत्याही पक्षाचे आमदार भाजपच्या आमिषाला बळी पडून फुटणार नाहीत. महाराष्ट्र हा भाजपसाठी आता खरेदी-विक्रीचा संघ नाही. ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी यापूर्वीच केली असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला.

आव्हाड यांनी आज सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात भाजपकडून काही आमदारांना फोडले जाण्याचा प्रकार केला जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर आपण काय सांगाल? असे विचारले असता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा

आता कोणत्याही पक्षाच्या आमदारांचे गट फुटणार नाहीत. ५० कोटींचा डाव लावला तरी काही होणार नाही. सेना भाजपने त्यांची भूमिका ठरवली पाहिजे. यासाठी उशीर झाला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीती आव्हाडांनी व्यक्त केली. सध्या सेना आणि भाजप सत्तास्थापनेसाठी काय भूमिका घेतात हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वजण नेमकं काय घडेल हे पाहत आहेत. परंतू, जे काय होईल ते पुढच्या ५ दिवसात होईल. भाजपने शिवसेनेला अल्टिमेटम दिला असल्याची माहिती मिळाल्याचे आव्हाड म्हणाले. त्यामुळे या दोघांच्या निर्णयावर महाराष्ट्राची पुढची राजकीय भूमिका ठरणार आहे. राज्यात निर्णायक अवस्थेमध्ये कोणीच नसल्याचे आव्हाड म्हणाले.

Intro:
आता कोणी फुटणार नाहीत, ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी यापूर्वीच केली ; जितेंद्र आव्हाड

mh-mum-01-ncp-jitendra-avhad-byte-7201153

(फीड mojo वर पाठवले आहे)

मुंबई, ता. १० :

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाच्या आमदारांचे गट भाजपाच्या अमिषाला बळी पडून आता फुटणार नाहीत. आणि महाराष्ट्र हा भाजपसाठी आता खरेदी विक्रीचा संघ नाही.यामुळे आता कोणी फुटणार नाहीत, आणि ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी यापूर्वीच केली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
आव्हाड यांनी आज दुपारनंतर सिल्वर ओक बंगल्यावर येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्या भेटीनंतर राज्यात भाजपाकडून काही आमदारांना फोडले जाण्याचा प्रकार केला जात असल्याच्या चर्चा आहेत, त्यावर आपण काय सांगाल असे विचारले असता आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आव्हाड म्हणाले की,आता कोणत्या पक्षाच्या आमदारांचे गत फुटत नाहीत. 50 कोटीचा डाव लावला तर असे काही होत नाही. महाराष्ट्र हा तसा खरेदी विक्री संघ नाहीये अजून तरी इतकी राजकीय पाळे मुळे राज्यात मजबूत आहेत. मात्र ज्यांनी गद्दारी करायची होते त्यांनी यापूर्वीच केलेली आहे त्यामुळे आता तसं होईल असं मला वाटत नाही असेही आव्हाड म्हणाले.

सेना भाजप आणि आपली भूमिका ठरवली पाहिजे यासाठी उशीर झाला तर राज्य राष्ट्रपती राजवट तिकडे जाईल अशी भीती आव्हाड यांनीे व्यक्त केली. सध्या सेना आणि भाजपा सत्तास्थापनेसाठी काय भूमिका घेतात हेही तितकेच महत्त्वाचे असून त्यामुळे सर्वजण नेमकं काय घडेल हे पाहत आहेत. परंतु जे काय होईल ते पुढच्या पाच दिवसात होईल. आत्ताच एक बातमी अशी आहे की, भाजपने शिवसेनेला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे या दोघांच्या निर्णयावर महाराष्ट्राचे पुढची राजकीय भूमिका ठरणार आहे. तरी सुद्धा राज्यात निर्णायक अवस्थेमध्ये कोणीच नाहीत हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय अस्वस्थता आहे त्यामुळे लवकर निर्णय झाला नाही तर राज्य राष्ट्रपती राजवटीकडे जाईल अशी भीती मला वाटते असेही आव्हाड म्हणाले.

Body:आता कोणी फुटणार नाहीत, ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी यापूर्वीच केली ; जितेंद्र आव्हाडConclusion:
Last Updated : Nov 10, 2019, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.