मुंबई - एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही वारिस पठाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मी सच्चा भारतीय असून, माझी संविधानावर निष्ठा आहे. वारिस पठाण यांनी केलेल्या भडकाऊ भाषणाला 'आम्ही भारताचे लोक' राज्यघटनेने उत्तर देणार असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
-
भारतीय संविधानावर निष्ठा आणि श्रद्धा असलेला मी एक 'सच्चा भारतीय' आहे याचा मला आज अभिमान वाटतोय.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
वारीस पठाण यांच्या भडकाऊ भाषणाला 'आम्ही भारताचे लोक' राज्यघटनेने उत्तर देणार.@warispathan#We_The_People_Of_India
">भारतीय संविधानावर निष्ठा आणि श्रद्धा असलेला मी एक 'सच्चा भारतीय' आहे याचा मला आज अभिमान वाटतोय.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 21, 2020
वारीस पठाण यांच्या भडकाऊ भाषणाला 'आम्ही भारताचे लोक' राज्यघटनेने उत्तर देणार.@warispathan#We_The_People_Of_Indiaभारतीय संविधानावर निष्ठा आणि श्रद्धा असलेला मी एक 'सच्चा भारतीय' आहे याचा मला आज अभिमान वाटतोय.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 21, 2020
वारीस पठाण यांच्या भडकाऊ भाषणाला 'आम्ही भारताचे लोक' राज्यघटनेने उत्तर देणार.@warispathan#We_The_People_Of_India
काय म्हणाले होते वारिस पठाण
वारिस पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. जर आम्हीही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.