ETV Bharat / state

जेट अखेर जमिनीवर.. बुधवारी रात्रीपासून जेट एअरवेजची सेवा बंद

कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजने बँकांकडे ४०० कोटींची मदत मागितली होती. मात्र, बँकांनी जेट एअरवेजला मदत नाकारली. त्यामुळे बुधवारी रात्री १२ पासून जेट एअरवेजच्या विमाने  शेवटचे उड्डाण केले. जेट एअरवेज संकटात सापडल्याने २० हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

author img

By

Published : Apr 18, 2019, 10:39 AM IST

जेट अखेर जमिनीवर.. बुधवारी रात्रीपासून जेट एअरवेजची सेवा बंद

मुंबई - जेट एअरवजेची उड्डाणे बुधवार रात्रीपासून बंद करण्यात आली आहेत. बँकांनी ४०० कोटींची आपत्कालीन मदत देण्यास नकार दिल्याने जेट एअरवेजची सेवा बंद झाली आहे. बुधवार रात्री १०.३० वाजता जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईहून अमृतसरसाठी शेवटचे उड्डाण केले असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता जेट एअरवेजचे विमान उड्डाण करणार नाही.

कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजने बँकांकडे ४०० कोटींची मदत मागितली होती. मात्र, बँकांनी जेट एअरवेजला मदत नाकारली. त्यामुळे बुधवारी रात्री १२ पासून जेट एअरवेजच्या विमाने शेवटचे उड्डाण केले. जेट एअरवेज संकटात सापडल्याने २० हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. या कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत आंदोलन केले होते.

गेल्या आर्थिक वर्षात जेट एअरवेजला ४ हजार २४४ कोटींचे नुकसान सहन करावे लागले. कंपनीने जानेवरीपासून वैमानिकांना, अभियंत्यांना, व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन दिले जात होते. मात्र, त्यांनाही मार्च महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. कधीकाळी देशातील अव्वल विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजची पाचपेक्षा कमी विमाने सध्या उड्डाण करत आहेत. त्यांचीही सेवा बुधवार रात्रीपासून बंद झाली आहे. कंपनीने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत.

Intro:Body:MH_Jet__Close_Midnight17.4.19

जेट अखेर जमिनीवर

रात्रीपासून सेवा बंद

मुंबई: जेट एअरवजेची उड्डाणं आज रात्रीपासून बंद होणार आहेत. बँकांनी 400 कोटींची आपत्कालीन मदत देण्यास नकार दिल्यानं जेट एअरवेजची सेवा केली जाणार आहे. आज रात्री 10.30 वाजता जेट एअरवेजचं विमान मुंबईहून अमृतसरसाठी उड्डाण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर जेट एअरवेजचं विमान उड्डाण करणार नाही. 

कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजनं बँकांकडे 400 कोटींची मदत मागितली होती. मात्र बँकांनी जेट एअरवेजला मदत नाकारली. त्यामुळे आज रात्री 12 पासून जेट एअरवेजची विमानं उड्डाण करणार नाहीत. जेट एअरवेज संकटात सापडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. या कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत आंदोलन केलं होतं. 

गेल्या आर्थिक वर्षात जेट एअरवेजला 4 हजार 244 कोटींचं नुकसान सहन करावं. कंपनीनं जानेवरीपासून वैमानिकांना, अभियंत्यांना, व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन दिलेलं नाही. या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन दिलं जात होतं. मात्र त्यांनाही मार्च महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. कधीकाळी देशातील अव्वल विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजची पाचपेक्षा कमी विमानं सध्या उड्डाण करत आहेत. त्यांचीही सेवा आज रात्रीपासून बंद होईल. कंपनीनं सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणंदेखील रद्द केली आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.