मुंबई - हिंदीतील 'बिग बॉस'चा नवा सीझन खूपच मनोरंजक पद्धतीनं सुरू झाला आहे. ६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता बिग बॉस 18 चे पहिले नॉमिनेशन होणार आहे. यासाठी स्पर्धकांमध्ये दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम त्यांच्या विरोधी टीममधील सदस्यांना नॉमिनेट करतील आणि आपल्या टीम मेंबरचे संरक्षण करतील.
आज, 9 ऑक्टोबर रोजी, बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शोचा नवीन प्रोमो अपलोड केला आहे. प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात होणाऱ्या पहिल्या नामांकन फेरीची झलक दाखवण्यात आली आहे. ही माहिती शेअर करताना निर्मात्यांनी नॉमिनेशनबद्दल अपडेट दिले आहेत. "एका बाजूला गुणरत्न विरुद्ध करण आणि दुसऱ्या बाजूला चाहत विरुद्ध विवियन. हंगामाच्या पहिल्याच नॉमिनेशनमध्ये 'तांडव'चे मीटर तापले.", असं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.
बिग बॉसच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये एक बोर्ड दर्शविला आहे आणि त्यावर घरातील सर्व 18 स्पर्धकांचे फोटो दिसतात. याच्या बोर्डवर 'डेथ ऑर्डर' असं लिहिलं आहे. काळ्या कपड्यानं झाकलेला एक व्यक्ती नॉमिनेटेड सदस्यांवर बाण मारताना दिसत आहे. दरम्यान, करणवीर मेहराचा गुणरत्नबरोबर वाद झाला. दुसरीकडे, चाहत आणि विवियन भांडताना दिसतात. सीझनचे पहिले नॉमिनेशन खूपच धमाकेदार असणार याची झलक यातून दिसत आहे.
'बिग बॉस 18' चे स्पर्धक
यावर्षी 'बिग बॉस'मध्ये गधराजला ( गाढव ) 18 स्पर्धकांसह घरात एन्ट्री देण्यात आली आहे. यामुळे शोबद्दलची उत्कंठा वाढीस लागली आहे. ईशा सिंग, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, नायरा बॅनर्जी, श्रुतिका अर्जुन राज, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना, शेहजादा धामी, सारा अरफीन खान, गुणरत्न, अरफीन खान, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, एलिस कौशिक, हेमा शर्मा विरल भाभी, तजिंदर बग्गा आणि चुम दरंग हे स्पर्धक म्हणून शोमध्ये सामील झाले आहेत. सलमान खानचा हा शो कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रसारित होत आहे.