ETV Bharat / state

"एअर इंडियानं अन्याय केला...", रामदास आठवले नागरी उड्डाण मंत्र्यांकडं करणार तक्रार, नेमकं प्रकरण काय? - RAMDAS ATHAWALE ON AIR INDIA

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एका महत्वाच्या कामासाठी मुंबईहून दिल्लीला जायचं होतं, परंतु एअर इंडियाच्या गलथान कारभारामुळं त्यांना जाता आलं नाही.

RAMDAS ATHAWALE ON AIR INDIA
एअर इंडियाच्या गलथान कारभारावर रामदास आठवले नाराज (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2024, 7:45 PM IST

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज (9 ऑक्टोबर) सकाळी एअर इंडियाच्या विमानानं सकाळी 9 वाजता दिल्लीला रवाना होण्यासाठी निघाले. दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने रवाना झाले. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं पुन्हा मुंबई विमानतळावर विमानाचं लँडिंग करण्यात आलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान दुरुस्ती करण्यासाठी ते विमान मुंबई विमानतळावर 4 तासांपासून विमानतळावरच थांबवण्यात आल्यानं रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केलीय.

रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी : विमान सकाळी 9 वाजल्या पासुन दुपारी 1 वाजेपर्यंत विमानतळावरच थांबवण्यात आलं. त्यामूळे सकाळी 8 वाजता विमानतळावर आलेले रामदास आठवलेंना दुपारी 1 वाजेपर्यंत विमानतळावर अडकून राहावं लागलं. विमानात बिघाड झाल्यानंतर एअर इंडियानं प्रवाशांना अन्य विमानानं त्यांच्या गांत्व्यास्थळाकडे रवाना करणं आवश्यक होतं. मात्र, 6 तासांपेक्षा जास्त वेळ प्रवाशांना ताटकळत राहावं लागलं.

एअर इंडियानं अन्याय केला : "विमानात तांत्रिक बिघाड झाल्यास विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानानं प्रवासाची मुभा दिली पाहिजे. मात्र, एअर इंडियानं तांत्रिक बिघाड झालेल्या विमानातच प्रवाशांना बसवून फार मोठा अन्याय केला. एअर इंडियाचा हा गलथान कारभार अक्षम्य आहे," असं म्हणत रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच केंद्रीय हवाई नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिधिंया यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. शरद पवारांचा भाजपाला पुन्हा 'दे धक्का'; संजय काकडे 'तुतारी' घेणार हाती
  2. मंत्रालयात नोकरीच्या आमिषानं गंडवलं; लिपिक पदाचं बनावट नियुक्तीपत्र दिलं, जोडपं अटकेत
  3. रमेश कदम, बाळा भेगडे, विवेक कोल्हे...; शरद पवारांचे जुने मावळे पुन्हा 'तुतारी' फुंकणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.