ETV Bharat / state

जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला; मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ठराव - मंत्रीमंडळ बैठक

देशभरातील विविध विद्यार्थी संघटना आणि राजकीय नेत्यांकडून सुरू असतानाच आज राज्य मंत्रिमंडळात ही यासाठीचा एक ठराव संमत करण्यात आला. या दोन्ही परीक्षा केंद्र सरकारने पुढे ढकलाव्यात यासाठीचा हा ठराव करण्यात आला असून तो केंद्राकडे लवकरच पाठविण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मंत्रालयात दिली.

जेईई -नीट परीक्षा पुढे ढकला; मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ठराव

author img

By

Published : Aug 26, 2020, 8:44 PM IST

मुंबई - देशभरात कोरोनाचे संकट असल्याने अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या जेईई आणि नीट या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी देशभरातील विविध विद्यार्थी संघटना आणि राजकीय नेत्यांकडून सुरू असतानाच आज राज्य मंत्रिमंडळात ही यासाठीचा एक ठराव संमत करण्यात आला. या दोन्ही परीक्षा केंद्र सरकारने पुढे ढकलाव्यात यासाठीचा हा ठराव करण्यात आला असून तो केंद्राकडे लवकरच पाठविण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मंत्रालयात दिली.

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी(एनटीए) या संस्थेकडून देशभरात जेईई मेन आणि नीट या परीक्षांचे आयोजन केले जाते. या दोन्ही परीक्षा 1 ते 16 सप्टेंबर या कालावधीत दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी एनटीएने या दोन्हीही परीक्षांचे एडमिट कार्ड विद्यार्थ्यांना त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. देशात कोरोनाचे संकट असल्याने देशभरातील विविध राजकीय पक्षांनी आणि विद्यार्थी संघटनांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र, केंद्राने अद्यापही त्यावर निर्णय घेतला नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ नये याविषयीचा मुद्दा हाताळला त्या बैठकीतसुद्धा त्यांनी केंद्र सरकारला या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली.

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एमपीएससीच्या परीक्षांसोबतच जेइई आणि नीट या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर एकमत झाल्याने केंद्राकडे याविषयीचा ठराव पाठवण्यात येणार आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही केंद्र सरकारला या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. हा निर्णय घेण्यात आला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही स्वामी यांनी केंद्राला दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.