मुंबई: जयंत पाटील म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांच्या भेटीला राजभवन येथे गेलो होतो. दरम्यान, वाय बी सेंटरला यायचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत, असे कळविण्यात आले. जयंत पाटील तेथे पोहोचले असता अजित पवार आमदारांसह शरद पवारच्या भेटीला आलेले आढळले. त्यांनी पवार यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्षे ज्यांनी काम केले आहे त्यांचे हे कुटुंब आहे. त्यातील काहींनी वेगळी कृती केली आहे. यातून मार्ग काढावा, अशी विनंती अजित पवारांनी केली, असे जयंत पाटलांनी सांगितले.
भेटायला येणाऱ्याला पवार भेटतात: शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या सर्वांना भेटत असतात. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवरती शंका येण्याचे कारण नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राजकारणात संवाद कधीच बंद करायचा नसतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष आहे. शरद पवारांनी येवल्यातील सभेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आमदार नाराज आहेत की, नाही हे तुम्ही आमदारांना विचारा. आमच्यातील काही विरोधी पक्षाच्या बाजूला बसले आहेत. संवादातून चांगल्या काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे संवाद चालू ठेऊन हे योग्य असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आशीर्वाद घेण्यासाठी येतात: अजित पवार गटाकडून निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांना विनंती करण्यात आली. त्यामुळे भेटीनंतर कोणी अस्वस्थ होण्याचे कारणच नाही. प्रत्येक वेळेच्या भेटीबद्दलचे शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, असं मला वाटत नाही. उद्या आम्ही आंदोलनाच्या वेळी पायऱ्यांवर दिसू. वयाचा विचार करता शरद पवारांना घरी बसवा, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काहीजण देत आहे. यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, याबाबत आपण जरा उलटा विचार करावा, असे म्हणणारे बरेच जण शरद पवारांच्या भेटीला येतात आणि आशीर्वाद घेतात. बांगळरू येथील विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार उद्या उपस्थित राहणार आहे, अशी माहितीसुद्धा जयंत पाटलांनी दिली.
हेही वाचा:
- NCP MLAs Meet Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट; 'हे' आहे भेटीमागचे कारण
- NCP Political Crisis: राष्ट्रवादीत हाय होल्टेज ड्रामा; अजित पवारांसह बंडखोर आमदारांची शरद पवारांसोबत चर्चा
- Nana Patole On Opposition Party: पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस निभावणार - नाना पटोले