मुंबई - मनसुख हिरेन प्रकरणांत तपासाअंती सत्य बाहेर येईल. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच या बैठकीत गृहमंत्री यांच्या राजीनाम्यासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. तसेच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीचीही कोणती चर्चा या बैठकीत झाली नाही. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावर याबाबत निर्णय घेतील. तो त्यांचा अधिकार आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
वर्षावर पार पडली बैठक -
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवार आणि जयंत पाटील हे उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात तसेच एकनाथ शिंदे आणि अनिल परब हे नेतेही उपस्थित होते. राज्यातील समस्यांवर या बैठकीत चर्चा झाली. यासोबतच सचिन वाझे प्रकरणात ही चर्चा या बैठकीत झाली आहे. बैठकीत गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांवर कोणतेही चर्चा झाली नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण: पीपीई कीट घालून सचिन वाझे, की इतर कुणी व्यक्ती
राजीनाम्या संदर्भात कोणतीही चर्चा नाही -
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एपीआय सचिन वाझे याना एनआयएने अटक केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. तर तिथेच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची ही तातडीने बदली करावी अशा प्रकारची मागणी केली जात आहे. मात्र, तपासाअंती सत्य बाहेर येईल. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच या बैठकीत गृहमंत्री यांच्या राजीनामे संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. तसेच मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या बदलीची ही कोणती चर्चा या बैठकीत झाली नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - मुंबई पोलीस आयुक्त अडचणीत, पोलीस दलात मोठ्या फेरबदलांची शक्यता