मुंबई - दिल्लीमधील जामिया येथे गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा शाहीनबागमध्ये एका माथेफिरूने गोळीबार केला. या घटनेवर जलसंपदा मंत्री यांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटना संशयास्पद असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. या हल्लेखोरांचा बोलवता धनी कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
-
दिल्लीमधील जामिया येथे गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा शाहीनबागमध्ये एका माथेफिरूने गोळीबार केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र या घटना संशयास्पद आहेत. या हल्लेखोरांचा बोलवता धनी कोण? गृहमंत्रालयाने यात लक्ष घालायला हवे.#ShaheenBaghProtest
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">दिल्लीमधील जामिया येथे गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा शाहीनबागमध्ये एका माथेफिरूने गोळीबार केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र या घटना संशयास्पद आहेत. या हल्लेखोरांचा बोलवता धनी कोण? गृहमंत्रालयाने यात लक्ष घालायला हवे.#ShaheenBaghProtest
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 1, 2020दिल्लीमधील जामिया येथे गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा शाहीनबागमध्ये एका माथेफिरूने गोळीबार केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र या घटना संशयास्पद आहेत. या हल्लेखोरांचा बोलवता धनी कोण? गृहमंत्रालयाने यात लक्ष घालायला हवे.#ShaheenBaghProtest
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 1, 2020
शाहीन बागमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले असून, पोलिसांच्या हवाली केले आहे. यावेळी तो म्हणाला देशामध्ये हिंदूचेच चालणार. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव कपील गुर्जर (वय २५) असून, तो दल्लुपुरा येथील रहिवासी आहे. लोकांनी त्याला पकडल्यानंतर त्याने जय श्री रामचे नारे लावले आहेत. शाहीन बागेत गोळीबार केल्यानंतर त्याने पिस्तूल फेकून देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले. या घटना संशयास्पद असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. गृहमंत्रालयाने यात लक्ष घालायला हवे असेही ते म्हणाले.