ETV Bharat / state

Monsoon Session 2023 : मुंडेंच्या खिशातील हातावर जयंत पाटलांची हरकत

विधानसभेत लक्षवेधी सुरू असताना त्या लक्षवेधीवर उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे सभागृहात बोलत होते. मात्र अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील उभे राहिले आणि म्हणाले माझी हरकत आहे. धनंजय मुंडे यांच्या खिशात हात घालून बोलण्यावर पाटलांनी हरकत घेतल्याने सभागृह अवाक झाले. (Monsoon Session 2023)

Jayant Patil - Dhananjay Munde
जयंत पाटील - धनंजय मुंडे
author img

By

Published : Jul 26, 2023, 4:34 PM IST

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. सभागृहात राज्यातील पाऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दररोज चर्चा होत आहे. या चर्चे दरम्यान अनेक सदस्य आपापली मते आक्रमकपणे मांडत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, बोगस बियाण्यांचे प्रश्न, खतांचे प्रश्न सभागृहात माडले जात आहेत. मात्र असे असले तरी सभागृहातील नवीन राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि कटूता ही सातत्याने दिसून येताना पहायला मिळत आहे.

सभागृहात कटूतेचे दर्शन : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपला विरोधी पक्ष नेता घोषित केलेला नाही. किंवा महाविकास आघाडीनेही आपला विरोधी पक्ष नेता नेमलेला नाही असे असताना सभागृहातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे विरोधकांच्या वतीने आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि धनंजय मुंडे व अजित पवार यांच्यामध्ये मात्र अधिक कटूता आल्याचे सभागृहात या चर्चे दरम्यान पाहायला मिळत आहे.

लक्षवेधीला कृषी मंत्र्यांचे उत्तर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भातील लक्षवेधीला कृषी मंत्री धनंजय मुंडे सभागृहात उत्तर देत होते. बोगस बियाण्यांसाठी सरकारने कायदा केला आहे. तसेच खतांच्या संदर्भातही कायदा केला असून तीन कंपन्यांवर कारवाई केल्याची माहिती ते सभागृहात देत होते. यावेळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी उठून हरकत घेतली.

खिशातील हातावर हरकत : कृषिमंत्र्यांच्या उत्तरावर काय हरकत आहे असे विधानसभा अध्यक्षांनी विचारले असता, धनंजय मुंडे जबाबदार मंत्री आहेत ते कृषी खात्याचे प्रतिनिधित्व करत आहेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खात्याचे मंत्री असलेल्या व्यक्तीने खिशात हात घालून बोलू नये. हा सभागृहातील सदस्यांचा अपमान आहे असे सांगत जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या खिशातील हातावर थेट हरकत घेतली.

माझ्यावर त्यांचे बारीक लक्ष : जयंत पाटील यांच्या या कृतीवर सभागृहातील अन्य सदस्य अवाक झाले. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की माझ्या प्रत्येक बाबतीत आता त्यांना हरकत असणार आहे माझ्यावर त्यांचे बारीक लक्ष आहे यातच माझे त्यांच्यासाठी किती महत्त्व आहे हे दिसून येते असा प्रति टोला लगावला.

हेही वाचा

  1. Monsoon Session 2023 : बोगस खते बियाणांच्या प्रश्नावर विधानसभेत गदारोळ
  2. Monsoon session 2023: मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार बरंच काही लपवत असल्याचा संशय - पृथ्वीराज चव्हाण
  3. Maharashtra Monsoon session 2023 Updates: विरोधकांचा विधानसभेत सभात्याग, इगतपुरीच्या विषयावरून विरोधक आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.