मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी विभागेने (एनसीबी) टॅलेंट मॅनेजर जया शहा यांची आज ४ तास चौकशी केली. उद्या पुन्हा शहा यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्यासह श्रुती मोदी यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील कथित ड्रग संदर्भी व्हॉट्सअॅप चॅटबद्दल अमली पदार्थविरोधी पथक चौकशी करत आहे. या प्रकरणी आतापर्यंत रिया चक्रवर्तीसह १८ आरोपींना एनसीबीने अटक केली आहे. तपासणीसाठी एनसीबी कार्यालयापासून दूर एक गेस्ट हाऊस निवडण्यात आले होते.
हेही वाचा- 'कृषी विधेयकाविरोधात लोकांच्या मनातील शंकांना केंद्र सरकार उत्तर का देत नाही'