मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी आज मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 'जुहू हरे रामा हरे कृष्णा मंदिर' येथील 'गांधी ग्राम शाळेत त्यांनी मतदान केले.
मतदान करण्यासाठी शबाना आझमी या लॉस ऐंजेलीसवरुन भारतात आल्या आहेत. नागरिकांनाही त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. कोणालाही करा, पण मतदान करा, असे त्यांनी यावेळी म्हटले.