ETV Bharat / state

Javed Akhtar : मुलुंड न्यायालयाच्या सुनावणीकडे जावेद अख्तर यांनी फिरवली पाठ, काय आहे प्रकरण?

author img

By

Published : Mar 31, 2023, 8:06 PM IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात विधान केल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांना समन्स बजावण्यात आले होते. मुंलुंड न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणी दरम्यान जावेद अख्तर अनुपस्थित होते. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार आहे.

Javed Akhtar
जावेद अख्तर

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी मुंबईतील राम स्वरूप दुबे यांनी मुलुंड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. यासाठी अख्तरांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने अख्तरांची याचिका फेटाळली होती. आज मुलुंड न्यायला त्याबाबत सुनावणी होती. मात्र, जावेद अख्तर यांनी न्यायालयाच्या सुनावणीकडे पाठ फिरवली. 20 एप्रिल रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण? : सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये देशभर आणि जगात तालिबान यांच्याबाबत माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या सर्व पार्श्वभूमीवर देशांमध्ये देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तालिबानी प्रवृत्तीचा असल्याचे जावेद अख्तर यांनी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. अख्तरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांची तुलना त्यांनी तालिबानी संघटना प्रवृत्तीच्या लोकांसोबत केली होती. देशामध्ये सर्वत्र धर्मरक्षक दुडगुस घालतात आणि ते तालिबानी प्रवृत्तीचे आहे, असल्याचे त्यांनी म्हटले होते. याप्रकरणी मुंबईतील राम स्वरूप दुबे यांनी मुलुंड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती.

अख्तरांचा अर्ज फेटाळला : खासगी स्वरूपाची तक्रार दाखल केल्यामुळे मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी त्यांना कायद्यानुसार असलेल्या अधिकारानुसार जावेद अख्तर यांना या संदर्भात समन्स जारी केले होते. जावेद अख्तर यांनी त्यांच्याविरोधात जारी केलेल्या समन्सला मुंबईच्या सत्र न्यायालयांमध्ये आव्हान दिले होते. आणि त्यांच्या या आव्हान देण्याच्या अर्जाला सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती घुले यांनी फेटाळून लावलेला आहे.

पुढील सुनावणी 20 एप्रिलला : अख्तरांविरोधात जारी केलेल्या या समन्सला आव्हान देणारा जावेद अख्तर यांचा अर्ज त्यावेळेला फेटाळून लावला होता. त्यामुळे मुलुंड न्यायालयामध्ये न्याय दंडाधिकारी समोर आज त्या प्रकरणात सुनावणी होती. मात्र जावेद अख्तर हे आज सुनावणीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवल्याचीच चर्चा अधिक होते आहे. दरम्यान, 20 एप्रिल रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.

हेही वाचा : SRA Scam Case : एसआरए घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.