मुंबई : मुंबईमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या खूपच कमी ( Very few trees per population ) आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये झाडांची संख्या वाढवण्यासाठी वर्टिकल गार्डन ( Vertical Garden ) आणि टेरेस गार्डनवर ( Emphasis on terrace garden ) भर देण्यात यावा यासाठी नागरिक आणि सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा असा सल्ला तज्ञ मंडळींनी पालिकेच्या उद्यान विभागाला दिला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक ( Superintendent of Parks Department ) जितेंद्र परदेशी ( Jitendra Pardeshi ) यांनी दिली. लोकांना उद्यानाची माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड (Dashboard to provide information ) तयार करणार असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.
दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन : मुंबईत झाडांची संख्या वाढवण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा राणी बागेत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेची सांगता झाली. याबाबत माहिती देताना जितेंद्र परदेशी बोलत होते. यावेळी बोलताना, दोन दिवसीय कार्यशाळेत देशभरातून ७५ तज्ञ सहभागी होणार होते. त्यापैकी ६० तज्ञ सहभागी झाले होते. त्यांनी मुंबईत मोकळ्या जागा कमी असल्याने वर्टिकल गार्डन आणि टेरेस गार्डनवर भर दिला आहे. प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर टेरेस गार्डन उभारल्याने प्रत्येक इमारतीचे स्वतःचे हक्काचे गार्डन असेल. या गार्डनचा वापर त्या इमारतींमधील रहिवासी मॉर्निंग वॉक आणि इतर खेळासाठी करू शकतात. झाडांची संख्या वाढवण्यासाठी नागरिक तसेच सामाजिक संस्था (NGO) यांचा सहभाग असल्याशिवाय हे शक्य होणार असल्याचे मत तज्ञ मंडळींनी या कार्यशाळेत व्यक्त केल्याची माहिती परदेशी यांनी दिली.
डॅशबोर्ड तयार करणार : मुंबईत झाडे वाढवण्यासाठी कमी जागेत जास्त झाडे लावण्याच्या जपानी मियावाकी पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याच सोबत वर्टिकल गार्डन आणि टेरेस गार्डनवर भर दिला जाणार आहे. पालिका काय काम करते याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचत नाही. यासाठी पालिकेच्या गार्डन विभागाकडून जनजागृती केली जाईल. तसेच नागरिक एखाद्या विभागात गेल्यास त्या ठिकाणी कोणते गार्डन आहेत, त्यात कोणत्या सुविधा आहेत याची माहिती त्यांना मिळण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार करणार असल्याची माहिती परदेशी यांनी दिली.
मुंबईत ३० लाख झाडे : मुंबईमध्ये ३० लाख झाडे आहेत. मुंबईत मोकळ्या जागा कमी आहेत. यामुळे झाडांची संख्या वाढवणे शक्य नाही. यासाठी जपानी मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यात आली आहेत. मियावाकी पद्धतीने ४ लाख झाडे लावण्यात आली आहेत. पुलांच्या खाली मोकळी जागा आहे. त्याठिकाणी तसेच पुलांच्या पिलरवर उभी गार्डन उभारण्याचा पालिकेने प्रयत्न केला आहे. इमारतीच्या टेरेसवर उद्यान बनवण्यास पालिकेने परवानगी दिली आहे अशी माहिती परदेशी यांनी दिली.
मुंबईची लोकसंख्या | १ कोटी ३० लाख (२०११ च्या जनगणने नुसार) |
मुंबईत एकूण झाडे | ३० लाख |
मियावाकी पध्दतीची झाडे | ४ लाख |