ETV Bharat / state

मुंबईत 'जनधन'च्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगची 'ऐशी-तैशी' - mumbai corona social distancing news

राज्यातून ठिकठिकाणावरून आलेल्या माहितीनुसार, बँक कर्मचाऱ्यांवर या गर्दीचा ताण पडला आहे. बँकिंग सेवा द्यायची कशी? असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. राज्यातील अनेक राष्ट्रियकृत बँकांच्या बाहेर वृद्ध महिलांच्या रांगाच्या रांगत आहेत. त्यामध्ये अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 16, 2020, 5:18 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने ‘पंतप्रधान जनधन’ योजनेद्वारे खातेधारकांच्या खात्यांवर ५०० रुपयांची रक्कम जमा केली आहे. महिनाभरात ही रक्कम काढली नाही तर ती पुन्हा सरकारजमा होईल या अफवेने अनेक वृद्ध महिलांनी बँकांवर तोबा गर्दी केली. ही रक्कम काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, एटीएम अथवा डिजिटल बँक सेवेचा वापर करावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग गांभीर्याने घेतला जात नसून ५०० रुपये काढण्यासाठी बँकांबाहेर मोठी गर्दी केली जात आहे.

मुंबईत 'जनधन'च्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगची 'ऐसीतैसी'

राज्यातून ठिकठिकाणावरून आलेल्या माहितीनुसार, बँक कर्मचाऱ्यांवर या गर्दीचा ताण पडला आहे. बँकिंग सेवा द्यायची कशी? असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. राज्यातील अनेक राष्ट्रियकृत बँकांच्या बाहेर वृद्ध महिलांच्या रांगाच्या रांगत आहेत. त्यामध्ये अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विशेष म्हणजे, रांगेमध्ये अनेक वृद्ध महिला असल्याने कोरोना संसर्गाचा धोका देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे बँका अधिकाऱ्यांपुढे ही आता सेवा कशी द्यायची? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने किंवा रिझर्व्ह बँकेने किंवा बँकांच्या प्रतिनिधींनी याबाबत सार्वजनिक ठिकाणी येऊन आवाहन करावे आणि जनधन खात्यामध्ये जमा झालेली रक्कम कुठेही जाणार नाही असे सांगावे, अशी भावना बँकिंग क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. 21 दिवसाच्या लॉकडाऊननंतर आता येत्या 3 मेपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. हाताशी उपजीविकेसाठी पैसा नाही आणि त्यात अफवेचा रूपाने 500 रुपये काढण्यासाठी एकच महिना मुदत असल्याने बँकांवर गर्दी वाढली आहे.

हेही वाचा - अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 600 लोकांचा मृत्यू

‘जनधन योजना’ नेमकी आहे तरी काय?

सर्वसाधारणपणे बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास खातेधारकास दंड भरावा लागतो. मात्र अशीही काही खाती आहेत, जिथे कमीत कमी रक्कम शिल्लक ठेवण्याची सक्ती नसते. प्रधानमंत्री जनधन योजना एक असेच खाते आहे. देशातील प्रत्येक नागरिकास बँकिंग प्रणालीशी जोडण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आपण कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन जनधन खाते उघडू शकतो. केंद्र सरकार ‘पंतप्रधान जनधन’ योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते उघडते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुकसह इतर बरेच फायदे आहेत.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात झालेल्या लॉकडाऊनकाळात सर्वसामान्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तीन महिन्यांपर्यंत महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये ठेवण्याची घोषणा मागील महिन्यात केली. त्यामुळे एप्रिल महिन्याचे ५०० रुपये काढण्यासाठी महिला बँकांबाहेर गर्दी करताना दिसतात. जनधन खाते उघडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. १० वर्ष किंवा त्याहून जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. त्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग परवान्यासह, केवायसीची आवश्यकता पूर्ण करणारी कागदपत्रे तुम्ही भरू शकता. मात्र, ही कागदपत्रे नसल्यास सेल्फ अटेस्टेड फोटो आणि बँक अधिकाऱ्यासमोर तुमची सही करून एक लहान खातेदेखील उघडता येते.

कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?

या खात्यात रूपे डेबिट कार्ड सुविधा देण्यात आली आहे. एटीएमसदृश ‘रुपे कार्ड’ हे भारतीय बनावटीचे पहिले कार्ड आहे. या डेबिट कार्डवर एक रुपये अपघात विमा विनामूल्य उपलब्ध आहे. तसेच या खातेधारकांना आपल्या खात्यावर चेकबुकची सुविधा हवी असेल तर त्यांना आपल्या खात्यात काही रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक असते. तर सहा महिन्यांपर्यंत खात्यांचे समाधानकारक कामकाज संपल्यानंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. तसेच या योजनेच्या खातेधारकांना पूर्ण भारतात कुठेही पैसे ट्रान्सफर करता येतात.

ओव्हरड्राफ्ट सुविधेची अट काय आहे?

ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी जनधन खातेधारकांना पहिल्या सहा महिन्यांसाठी पुरेशी शिल्लक रक्कम राखणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त त्यांना त्यांच्या रूपे डेबिट कार्डाद्वारे नियमित व्यवहार करणेदेखील आवश्यक आहे.जनधन खात्यातही सरकारी अनुदानाचा फायदा होतो. आधारशी जोडलेल्या जनधन खातेधारकास शासकीय अनुदान योजनेंतर्गत थेट लाभ मिळू शकतो. त्याअंतर्गत कोणत्याही शासकीय अनुदानाचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होतात. महत्त्वाचे म्हणजे 15 ऑगस्ट 2014 ते 26 जानेवारी 2015 या कालावधीत जनधन खाते उघडले असेल, अशा खातेधारकांना ३० हजार रुपयांच्या जीवन विम्याचा लाभदेखील मिळतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.