ETV Bharat / state

बँक कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी द्या; जनता दलाची मागणी - बँक कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी

सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी काही प्रमाणात लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या लोकलमधून ज्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, त्यात बँक कर्मचाऱ्यांचा उल्लेख नाही. हा कोरोनाचा धोका पत्करून लॉकडाऊनच्या काळात कामावर येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे.

bank employees to travel by local
बँक कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी नाही
author img

By

Published : Jun 15, 2020, 9:49 PM IST

मुंबई - आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, त्यात बँक कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी असल्याचा उल्लेख नाही. दररोज लाखो बँक कर्मचारी कामानिमित्त प्रवास करत आहेत. या पार्श्वभूमीवर बँक कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

देशाची आर्थिक वाटचाल सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने बँकांचे महत्त्व आहे. त्यामुळेच, लॉकडाऊनच्या काळातही बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, सध्या ये-जा करताना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे, अनेक कर्मचारी आठवडाभर कामाच्या ठिकाणीच राहून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीच घरी जात आहेत. अशात त्यांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येत आहेत, असे जनता दलाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी काही प्रमाणात लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या लोकलमधून ज्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, त्यात बँक कर्मचाऱ्यांचा उल्लेख नाही. हा कोरोनाचा धोका पत्करून लॉकडाऊनच्या काळात कामावर येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे, या निर्णयाचा फेरविचार करून बँक कर्मचाऱ्यांनाही लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. त्यासाठी आवश्यक असल्यास केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.