ETV Bharat / state

Jaipur to Mumbai Train firing : जयपूर-मुंबई रेल्वेत नेमका गोळीबार कसा झाला? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती - Railway Officer reaction on Train firing

महाराष्ट्रातील पालघर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या जयपूर-मुंबई रेल्वेत आरपीएफ जवानाने आज चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना आज पहाटे घडली आहे. मृतकांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असे डीआरएम नीरज वर्मा म्हणाले.

Jaipur to Mumbai Train firing
आरपीएफ जवानाकडून गोळीबार
author img

By

Published : Jul 31, 2023, 11:13 AM IST

Updated : Jul 31, 2023, 2:02 PM IST

Jaipur to Mumbai Train firing
जयपूर-मुंबई रेल्वेत गोळीबार- भाग 1

मुंबई : जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. ही घटना सोमवारी पहाटे मुंबई सेंट्रल एसएफ एक्स्प्रेसमध्ये दहिसर आणि मीरा रोड दरम्यान घडली. गाडीतील कोच B-5 मध्ये गोळीबाराची घटना घडली आहे.आरपीफ जवानाच्या आपआपसातील वादामुळे ही घटना घडली आहे. या घटनेसंदर्भात डीआरएम नीरज वर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सकाळी 6 च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की, एस्कॉर्टिंग ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाने गोळीबार केला. चार जणांचा गोळीबारात मृत्यु झाला आहे. आमचे रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. मृतकांच्या नातेवाईकांना मदत दिली जाईल. ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही साक्षीदारांचीही तपासणी करत आहोत. आम्ही सर्व बाजूंनी तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत.

Jaipur to Mumbai Train firing
जयपूर-मुंबई रेल्वेत गोळीबार- भाग 2

गोळीबाराचे कारण अस्पष्ट : पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर म्हणाले, आज मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक आरपीएफ कॉन्स्टेबल, चेतन कुमार याने त्याचा सहकारी एएसआय टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. या घटनेदरम्यान, इतर तीन प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. प्राथमिक माहितीनुसार तपासात त्याने अधिकृत शस्त्र वापरून गोळीबार केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आम्ही तपास करत आहोत.

  • #WATCH | CPRO Western Railway, says "An unfortunate incident has been reported today in Mumbai-Jaipur Superfast Express. An RPF constable, Chetan Kumar opened fire on his colleague ASI Tikaram Meena and during the incident, three other passengers were also shot. According to a… pic.twitter.com/mzVnz7Rn7v

    — ANI (@ANI) July 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सहकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या : प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार केला. त्याने आपल्या एका सहकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ट्रेन बोरिवली स्थानकावर आल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आले. आरपीएफ जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. दहिसरजवळ कॉन्स्टेबल चेतन कुमारने खाली उतरून अलार्मची चेन ओढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरपीएफने त्याला शस्त्रासह अटक केली, असे निवेदनात म्हटले आहे. त्याची मानसिक प्रकृती ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत एएसआय मीना यांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची मदत जाहीर - मृत एएसआय मीना यांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.मीनाच्या नातेवाईकांना 20,000 रुपयांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाव्यतिरिक्त रेल्वे सुरक्षा कल्याण निधीमधून 15 लाख रुपये दिले जातील, असे पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी सांगितले. त्यांच्या नातेवाईकांना मृत्यू-सह-निवृत्ती ग्रॅच्युइटी आणि गट विमा योजनेतूनही रक्कम मिळेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा :

  1. Jaipur to Mumbai Train firing : जयपूर-मुंबई रेल्वेत आरपीएफ जवानाकडून गोळीबार, आरपीएफ एएसआयसह चार प्रवाशी ठार
  2. Firing In Pune : गुन्हेगारी वर्चस्ववादातून पुण्यात दोन गुंडांमध्ये गोळीबार
  3. Thane Crime News : नवी मुंबईत महिला बिल्डरवर गोळीबार, बांधकाम व्यावसायिकांवर महिन्यात दुसरा हल्ला

Last Updated : Jul 31, 2023, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.