मुंबई - झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखर तीर्थ हे पर्यटनस्थळ ( Announced Sammed Shikharji As A Tourist Place ) बनवण्याची घोषणा केली आहे. याच्या निषेधार्थ देशभरात जैन समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मुळात जैन समाज हा अत्यंत शांतता प्रिय असा समाज म्हणून ओळखला जातो. मात्र झारखंड सरकारने ( Jain Community Protest Against Jharkhand Government ) घेतलेल्या निर्णयामुळे या समाजाच्या देखील भावना दुखावल्या असून श्री सम्मेद शिखर तीर्थ हे ( Sammed Shikharji Tourist Place ) पर्यटनस्थळ बनवण्याची घोषणा केल्याचा निषेध म्हणून मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत जैन धर्मियांनी ( Jain Community Protest In Mumbai ) झारखंड सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे.
सकल जैन संघटनाकडून मोर्चा समस्त जैन संघटनांकडून हा मोर्चा ( Jain Community Protest In Mumbai ) काढण्यात आला आहे. सकल दिगंबर जैन समाज, श्वेतांबर जैन मूर्तीपूजक समाज, श्वेतांबर स्थानकवासी जैन समाज, श्वेतांबर तेरापंथी जैन समाज आणि इतर जैन समाजाच्या नागरिकांनी या मोर्चामध्ये सmहभाग घेतला. तर मुंबईतील जैन धर्मीयांच्या सात संघटनांनी सहभाग घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
जैन तीर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळात रूपांतर झारखंड सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ ( Parasnath Mountain ) डोंगरावरील श्री सम्मेद शिखरजी या जैन तीर्थक्षेत्राचे पर्यटनस्थळात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ठिकाण जैन धर्मीयांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. त्यामुळे झारखंड सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा निषेध जैन धर्मियांकडून व्यक्त केला जात आहे. झारखंड सरकारने घेतलेला हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठी देशभरातील जैन धर्मियांच्या संघटनांनी मागणी केली आहे. या निर्णयामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
इको सेन्सिटिव्ह झोन झारखंड सरकारने २०१८ मध्ये श्री सम्मेद शिखरजी या जैन तीर्थक्षेत्राचे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार २०१९ मध्ये या क्षेत्राला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून केंद्राने जाहीर केले. मात्र आता झारखंड सरकारने या क्षेत्राला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्यामुळे या परिसरात मास विक्री मद्य विक्री होईल अशी खंत जैन धर्मियांकडून व्यक्त केली जात आहे.