ETV Bharat / state

एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या जैद विलंत्रीला 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी - NCB arrest news

अमली पदार्थांच्या सिंडीकेटबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडूनसुद्धा मुंबईत तपास केला जात आहे. या तपासादरम्यान नार्कोटिक्स कंट्रोलकडून जैद विलंत्री या आरोपीला अटक करण्यात आली होती. यानंतर, त्याला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यास 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

जैद विलंत्रीच्या वकिलाची प्रतिक्रिया
जैद विलंत्रीच्या वकिलाची प्रतिक्रिया
author img

By

Published : Sep 3, 2020, 4:04 PM IST

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून तपास केला जात असताना अमली पदार्थांच्या सिंडीकेटबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडूनसुद्धा मुंबईत तपास केला जात आहे. या अनुषंगाने तपासादरम्यान नार्कोटिक्स कंट्रोलकडून जैद विलंत्री या आरोपीला अटक करण्यात आली होती. यानंतर, आज(गुरुवार) किल्ला न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आले होते.

जैद विलंत्रीच्या वकिलाची प्रतिक्रिया

न्यायालयात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक आरोपीच्या एनसीबी कोठडीची मागणी केली होती. अटक करण्यात आलेला आरोपीने कोणकोणत्या व्यक्तींना अमली पदार्थ पुरवले आहेत, याचा तपास करण्यासाठी त्याच्या एनसीबी कोठडीची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, अटक झालेल्या आरोपीच्या वकीलांकडून युक्तिवाद करताना सदर आरोपीवर एनसीबीकडून गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी कमी प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आरोपी जैद याच्या एनसीबी कोठडीची मागणी रास्त नसल्याचे आरोपीचे वकील तारक सैयद यांनी म्हटले आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी जैद यास 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - इम्युनिटी क्लिनिकमुळे प्रतिकारकशक्ती चांगली होण्यास मदत - अमित देशमुख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.