ETV Bharat / state

J J Hospital shooting case : जे. जे हॉस्पीटल गोळीबार प्रकरणात दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकास परदेशातून अटक, जाणून घ्या सविस्तर माहिती - Mumbai Crime Branch

J J Hospital shooting case : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा पती इस्माईल पारकरच्या हत्येचा बदला म्हणून 1992 मध्ये जे. जे हॉस्पीटलमध्ये दाऊद इब्राहिमनं गोळीबार घडवून आणला होता. याप्रकरणातील फरार झालेला प्रमुख आरोपी नझीर मोहम्मद फकीला तपास यंत्रणेन परदेशातून ताब्यात घेतलंय. नझीरला लवकरच भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

जे. जे हॉस्पीटल गोळीबार प्रकरणात दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकास परदेशातून अटक
J J Hospital shooting case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 10:52 PM IST

मुंबई J J Hospital shooting case : जे. जे हॉस्पीटलमध्ये 1992 साली झालेल्या गोळीबार प्रकरणात फरार झालेला प्रमुख आरोपी नझीर मोहम्मद फकी याला तपास यंत्रणेनं परदेशातून जेरबंद केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नझीरला पकडण्यात तपास यंत्रणांना तीन दशकांनंतर यश आल असून, लवकरच त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. (J J Hospital shooting case)

हत्येचा बदला म्हणून गोळीबार : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची (Gangster Dawood Ibrahim) बहिण हसीना पारकरचा पती इस्माईल पारकर याच्या हत्येचा बदला म्हणून 1992 मध्ये हा गोळीबार घडवून आणला होता. या गोळीबारानंतर नझीर मुंबईतून फरार होऊन पाकिस्तानात राहत असल्याची माहिती समोर आली होती. तसंच 1993 च्या बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून इंटलिजन्स एजन्सी त्याच्यावर नजर ठेवून होती. यानंतर तो वेगवेगळ्या फेक आयडी बनवून फिरत होता. आता मात्र त्याला पडण्यात तपास यंत्रणांना यश आलं असून, त्याला भारतात आणण्याची शक्यता आहे. दाऊद इब्राहिमनं त्याची बहीण हसीनाचा पती इस्माईल पारकरच्या हत्येचा बदला म्हणून घडवून आणलेल्या भयानक घटनेतील आरोपीला तीन दशकांनंतर अटक करण्यात आलीय.

छायाचित्र उपलब्ध नसताना अटक : सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गुप्तचर यंत्रणा बऱ्याचवर्षांपासून त्याच्या हालचालींवर नजर ठेवून होती. तो बनावट ओळख वापरून परदेशातही गेला होता. मात्र, नझीरला ताब्यात घेतल्यानंतर डी कंपनीशी संबंधित पाकिस्तानमध्ये असलेल्या मुख्यालयासंदर्भात व त्यांच्या सिंडिकेटबाबत बरीच माहिती प्राप्त केली जाऊ शकते, असा पोलिसांना विश्वास आहे. विशेष म्हणजे नझीरचे कुठलेही छायाचित्र उपलब्ध नसतानाही परदेशात त्याला अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिसाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत सांगितलं की, नझीरबद्दल माहिती मिळाल्यानंतर, मुंबई गुन्हे शाखेनं (Mumbai Crime Branch) त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी करण्यासाठी अर्ज केला होता. यानंतर नझीरच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. नझीरला आता अटक केली असून लवकरच त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Dawood D company : दाऊदचे डी कंपनी चालवण्यासाठी नवे जाळे, व्हॉइस मेसेजद्वारे कोड वर्डचा वापर
  2. Chhota Rajan : दाऊदच्या साथीदाराच्या हत्येच्या आरोपातून गँगस्टर छोटा राजनची दोष मुक्तता; सत्र न्यायालयाचा निर्णय
  3. NIA Raids : बनावट नोटांच्या पुरवठा प्रकरणांमध्ये 'एनआयए'चे मुंबईसह ठाण्यात छापे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.