ETV Bharat / state

Sachin Sawant House Raid : आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्याकडे सापडले कोट्यवधींचे घबाड

वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्याविरोधात 500 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात गुन्हा नोंदवत ईडीने काल त्यांना अटक केली. मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी ईडीला सचिन सावंत यांच्या घरात कोट्यावधींचे घबाड सापडले.

Sachin Sawant House Raid
सचिन सावंत
author img

By

Published : Jun 29, 2023, 7:34 PM IST

मुंबई : तब्बल 500 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपामुळे वादात सापडलेले आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या अडचणीत बेहिशेबी मालमत्ता सापडल्याने भर पडली आहे. सावंत यांनी वरिष्ठ अधिकारी पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सीबीआयने सचिन सावंत यांच्या आई-वडिलांसह पत्नीला देखील आरोपी केले आहे.

मालमत्तेत मोठी वाढ : सध्या ईडीच्या कोठडीत असलेले सावंत यांची मालमत्ता 2011 मध्ये 1 लाख 40 हजार रुपयांच्या घरात होती. ही मालमत्ता पुढच्या 10 वर्षांतच म्हणजे 2022 मध्ये खूप मोठ्या पटीने 2 कोटी 1 लाख इतकी झाली आहे. त्यामुळे सचिन सावंत हे मोठ्या अडचणीत सापडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणांनी सावंत यांच्या विरुद्ध कारवाईचा फास आवळलेला दिसत आहे.

'ती' रोख रक्कम बेकायदेशीर : सीबीआयने यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात सावंत यांचे आईवडील आणि पत्नीलाही आरोपी बनवलेले आहे. नवी मुंबई सानपाडा परिसरातील सी क्वीन हेरिटेज बिल्डिंगमध्ये सावंत यांनी सेव्हन हिल कन्स्ट्रोवल या कंपनीच्या नावे फ्लॅट खरेदी केला. ज्या कंपनीत सावंत यांचे वडील डायरेक्टर आहेत. सावंत यांचे वडील बाळासाहेब सावंत हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. 1 कोटी 25 लाखांच्या फ्लॅट खरेदीसाठी 1 कोटी 2 लाख रोख रक्कम वापरण्यात आली, जी बेकायदेशीर असल्याचा ईडीने दावा केला आहे.

सावंत यांच्याकडे 44 लाखांची बीएमडब्लू : बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सचिन सावंत यांनी पैसे वळवल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. काही रक्कम ही या बनावट कंपनीच्या खात्यावर वळती करण्यात आली होती. त्या कंपनीचे डायरेक्टर सावंत यांचे वडील आहेत. त्याचप्रमाणे सावंत यांच्या बँक अकाऊंटमध्येही वेगवेगळ्या माध्यमातून पैसे आल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा:

  1. Pune Crime News: पुण्यात 10 लाख रुपये किंमतीचे 'म्याव म्याव' ड्रग्स जप्त
  2. National Cyber Crime Portal : नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर 22 लाख तक्रारी, एफआयआर मात्र फक्त 43 हजार
  3. Chandrashekhar Azad : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला, गोळी कमरेला स्पर्श करून गेली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.