ETV Bharat / state

Iqbal Singh Chahal and ED Case : कोविड सेंटर वाटप प्रकरणी इक्बालसिंह चहल यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

कोरोना काळामध्ये कोविड सेंटर वाटप प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार भाजपनेते किरीट सोमैया यांनी केली होती. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ईडीने तपास सुरू केला आहे. आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी होत आहे. समन्सनुसार ते आज ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.

Iqbalsingh Chahal Is Being Investigated In The ED Office
इक्बालसिंह चहल यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू
author img

By

Published : Jan 16, 2023, 2:47 PM IST

मुंबई : मुंबई पोलिसांनी यापूर्वी नोंदवलेल्या आणि पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर वाटप प्रकरणासंदर्भात इक्बालसिंह चहल यांना समन्स बजावण्यात आले आहे. सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदारांना मुंबई आणि पुण्यातही कोविड केंद्र देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. उद्योगपती सुजित पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. संजय राऊत यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणातही त्यांची चौकशी करण्यात आली होती. पत्रा चाळ प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने सुजित पाटकर यांच्या घराची झडती घेतली होती. पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुलींसह मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या वाईन वितरण कंपनीत अतिरिक्त संचालक होते.

सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी : रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या रेकॉर्डनुसार 16 एप्रिल 2021 रोजी पाटकर आणि संजय राऊत यांच्या मुलींची फर्ममध्ये अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अलिकडेच राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कंपनीचा मुख्य व्यवसाय वाइन ट्रेडिंगमध्ये बदलल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता. कोविड फील्ड हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन करण्यासाठी उद्योगपती सुजित पाटकर यांनी मुंबई महापालिकेसोबत करार केल्यानंतर सुमारे एका वर्षानंतर करारावर स्वाक्षरी केली. त्यावेळी त्यांच्या कंपनीच्या खात्यात 32 कोटी रुपये जमा झाले आणि यासंबंधीची काही कागदपत्र अंमलबजावणी संचालनालयाला त्यांच्या घरी छापेमारी करताना सापडले होती.

हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन करण्याचा करार : आपल्या नोंदणी नसलेल्या कंपनीमार्फत बीएमसीचे कंत्राट मिळवून पाटकर यांनी हे काम एका डॉक्टरकडे सोपवले आणि कंपनीच्या नावावर फील्ड हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन करण्याचा करार केला असा त्यांच्यावर आरोप आहे.भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले बीएमसीकडून कराराशी संबंधित कागदपत्रे आरटीआयद्वारे मिळवली होती. यात पाटकर यांना सुमारे 100 कोटी रुपयांचे फील्ड हॉस्पिटलचे व्यवस्थापन करण्याचे कंत्राट मिळाले होते. आरटीआयद्वारे मिळालेल्या कागदपत्रांवरून सोमय्या यांनी दावा केला की हे करार फसवणूक करुन केले गेले आणि काम मिळाल्यानंतर एक वर्षाने करार करण्यात आला. पाटकर यांनी अशी मुंबईत चार आणि पुण्यात एक कंत्राट पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने फसवणूक करून मिळवली होती.

हेही वाचा : Hasan Mushrif : ईडीचे अद्याप आपल्याला एकही समन्स नाही, केवळ कुटुंबीयांना नाहक त्रास - हसन मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.