ETV Bharat / state

IOC Session Mumbai 2023 : आंतराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची १४ ऑक्टोबरपासून मुंबईत बैठक; तर क्रीडा मंत्र्यांनी केली 'ही' मागणी - IOC Session Mumbai

IOC Session Mumbai 2023 : महाराष्ट्रातील क्रीडा प्रकारांना आणि खेळाडूंना जागतिक स्तरावर जास्तीत जास्त संधी मिळावी, यासाठी राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगामी ऑलिंपिकचं आयोजन महाराष्ट्रात व्हावं अशी मागणी करणार असल्याचं राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी सांगितलं. मुंबईत १४ ऑक्टोबरपासून होणाऱ्या ऑलिंपिक समितीच्या बैठकीत (International Olympic Committee Meeting) हा मुद्दा मांडणार असल्याचं ते म्हणाले.

IOC Session Mumbai 2023
ऑलिंमपिक समितीची मुंबईत बैठक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 7:59 PM IST

मुंबई IOC Session Mumbai 2023 : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची 141 वी बैठक (International Olympic Committee Meeting) मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जिओ कन्वेंशन सेंटरमध्ये येत्या 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे. सुमारे 40 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची बैठक देशात होत आहे. यापूर्वी 1983 मध्ये दिल्लीत ही बैठक झाली होती. या बैठकीमुळे भारताला क्रीडा क्षेत्रात जागतिक नकाशावर स्वतःला स्थापित करणं शक्य होणार आहे. तसंच भारतासाठी क्रीडा क्षेत्रातील हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरणार असल्याचं क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी सांगितलं.

पंतप्रधानांची बैठकीला उपस्थिती : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी सदस्य आणि देशाच्या प्रतिनिधी नीता अंबानी उपस्थित असणार आहेत. कार्यकारी मंडळासोबत ही बैठक 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यानंतर 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं सत्र घेतलं जाणार आहे. या सत्राचा उद्घाटन समारंभ 14 ऑक्टोबरला पार पडणार आहे. यावेळी ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक उपस्थित राहणार आहेत.

सहाशेजण राहणार उपस्थित : हा या सत्रामध्ये ऑलिंपिक खेळांच्या यजमानाची निवड करणं, ऑलिंपिक समितीचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाची निवड करणं, ऑलिंपिक सनद ठरविणं तसंच त्यात सुधारणा करणं, ऑलिंपिक कार्यक्रमात खेळ प्रकारांचा समावेश करणं अथवा वगळणं याबाबतीत चर्चा होणार आहे. या बैठकीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे 600 आंतरराष्ट्रीय आणि देशातील शंभर प्रमुख खेळ प्रकारातील सहाशे व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचं बनसोडे यांनी सांगितलं.

भारतासाठी सुवर्णसंधी : या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बैठकीचं आयोजन ही भारतासाठी सुवर्णसंधी आहे. तरुणांच्या या देशांमध्ये त्यांच्या मनात खेळाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि क्रीडा विकासाबाबत वचनबद्धता निर्माण करणाऱ्या प्राधान्य देण्यात येत आहे. ऑलिंपिक स्पर्धा घेण्यासाठी भारत हा सज्ज देश आहे. भारतात ऑलिंपिक चळवळ दर्शक, चाहते आणि संबंधित ग्राहक हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. भारताला क्रीडा विकासाचा अतिशय मजबूत असा वारसा आणि कार्यक्रम आयोजनाचा अनुभव असल्याचेही त्यांनी सांगितलं. त्यामुळे ऑलिंपिकचे महाराष्ट्रात आणि मुख्य म्हणजे मुंबईमध्ये आयोजन व्हावं यासाठी आग्रही असून तशी मागणी या बैठकीत करणार असल्याचं बनसोडे यांनी म्हटलं आहे.

क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश करावा : ऑलिंपिकच्या विविध खेळांमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात यावा. भारत आणि अन्य आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तसेच जगातील अन्य देशांमध्ये ही क्रिकेटला वाढता प्रतिसाद मिळत असून जगभरात क्रिकेटचे चाहते आहेत. त्यामुळे आता ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा अशी मागणी या निमित्ताने करणार असल्याचं बनसोडे यांनी म्हटलं.

हेही वाचा -

  1. टोकियो ऑलिम्पिकने सिद्ध केलं की डब्ल्यूएचओचा सल्ला योग्य ठरला - आयओसी सल्लागार
  2. पॅरिस ऑलिम्पिकमधून भारोत्तोलनाला वगळणार? ऑलिम्पिक समितीला मिळाले नवे अधिकार
  3. टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीच्या महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.