ETV Bharat / state

Mumbai HC Order For Investigation: दोन मुलांचा बाप तरुणीला लग्नाचे आमिष दाखवतो त्याची चौकशी करा; उच्च न्यायालयाची पोलिसांना तंबी

author img

By

Published : Jul 28, 2023, 3:51 PM IST

मुंबईतील आरोपी दुकानदार मुकेश जैन याने त्या परिसरातील एका मुलीशी परिचय वाढवला आणि तिला एका हॉटेलमध्ये बोलावून लग्नाची मागणी घातली. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले की, आरोपीची कसून चौकशी करा.

Mumbai HC Order For Investigation
उच्च न्यायालयाची पोलिसांना तंबी

मुंबई : आरोपीचे अंधेरीमध्ये काचेचे दुकान आहे. त्या दुकानावर एकदा ती तरुणी आली. त्यानंतर त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि त्याने अधिक ओळख वाढवण्याचा प्रयत्न देखील केला. तिचेदेखील छोटेसे दुकान आहे. त्या मुलीशी मुकेशची प्रथम भेट 2 जुलै 2022 रोजी झाली होती. ही भेट प्रत्यक्ष त्याच्या दुकानामध्ये ती काही कामानिमित्त आल्या कारणाने झाली होती. नंतर मात्र त्याने ओळख जाणीवपूर्वक वाढवली, असा मुलीचा याचिकेत आरोप आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध : याचिकेत नमूद आहे की, 30 मार्च 2023 रोजी मुकेश जैन याने मुंबईत सहारा स्टार या मोठ्या हॉटेलमध्ये मुलीला जेवण करण्याच्या कारणाने बोलावले आणि दोघांचे खोटे बनावट ओळखपत्र देखील त्याने तयार केले. त्या वेळेला त्याने तिच्याशी गोड बोलून तिथे तिला लग्नाचे आमिष दाखवले. मुकेशने दुपारी 1 वाजता त्या दिवशी तिला हॉटेलला बोलावले. हॉटेलमध्ये तिला विश्वास वाटावा म्हणून महागड्या वस्तू आणल्या. बनावट ओळखपत्राच्या आधारे हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला. याचिकाकर्तीसोबत मुकेशने लग्नाबद्दल विषय काढला. लग्नाच्या बहाण्याने मुकेशने मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि दुपारी 3:30 वाजता हॉटेल सोडले. यानंतर तिला तिच्या दुकानाजवळ सोडले आणि त्यानंतरही ही मुलगी मुकेशशी फोनवर बोलत असे.

तिला न्यायालयात मागावी लागली दाद : 6 मार्च 2023 रोजी देखील आरोपी मुकेश मुलीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि पुन्हा लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतरही तो दोन-तीन दिवस तिच्याशी फोनवर बोलत होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने असेच लग्नाच्या बहाण्याने तिला बोलावले आणि शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तिला ही माहिती समजली की तो विवाहित आहे आणि त्याला दोन मुले देखील आहेत. ही माहिती तिला त्रयस्थ व्यक्तीकडून समजली. तो विवाहित आहे याची माहिती तिला होताच, तिने अंधेरी पोलीस ठाण्यात आरोपी मुकेश जैन विरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यानंतरही तो दाद देत नव्हता आणि पोलीस चौकशीत हयगय करीत होता. पोलीस आरोपीची चौकशी करण्याऐवजी पीडित मुलीलाच रोज पोलीस ठाण्यामध्ये बोलावून सहा, सात तास बसवून ठेवायचे. त्यामुळे तिला न्याय मिळावा, अशी तिने याचिकेतून मागणी केली होती. त्याबाबतच आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता न्यायालयाने पोलिसांना खडसावले आणि आरोपीची कसून चौकशी करा, तक्रारदार मुलीला तुम्ही वारंवार पोलीस ठाण्यामध्ये बोलवू नका, असे बजावत पोलिसांना इशारा दिला.

प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश : तक्रारदार मुलीच्या वतीने जिगर अग्रवाल यांनी बाजू मांडली. आरोपीने जामीन मागण्यासाठी देखील अर्ज केलेला नाही. त्याने लग्न करणार असे सांगून तिला फसवले आणि तिच्याशी त्याने अनेकदा शरीरसंबंध ठेवले. त्याचमुळे हा गंभीर गुन्हा आहे. म्हणूनच मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी पोलिसांना आदेश दिले की, या प्रकरणाची कसून चौकशी करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.