ETV Bharat / state

कोरोनाबाधितांसाठी मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल बीएमसीच्या ताब्यात - बीएमसी इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल ताबा बातमी

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे.

BMC
बीएमसी
author img

By

Published : Apr 15, 2021, 11:50 AM IST

Updated : Apr 15, 2021, 1:03 PM IST

मुंबई - मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेड्स कमी पडत आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने लक्षणे असलेल्या रुग्णांवर रुग्णालयात तर लक्षणे नसलेल्या व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर हॉटेलमध्ये उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने इंटरकॉन्टिनेंटल, ट्रायडंट हे दोन हॉटेल ताब्यात घेतले आहेत. या हॉटेलमध्ये बॉम्बे हॉस्पिटल तसेच एच एन रिलायन्स रुग्णालयाकडून उपचार केले जाणार आहेत. तसेच इतर ठिकाणीही बेड्स वाढवले जात असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

पंचतारांकीत हॉटेल ताब्यात -

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून पुन्हा रूग्णांचा संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्सची कमतरता जाणवत असल्याने ज्या रूग्णांवर रुग्णालयात उपचार करण्याची आवश्यकता नाही, अशा रूग्णांना हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तर, ज्यांना लक्षणे आहेत, ऑक्सिजन, आयसीयू तसेच व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे अशांना रूग्णालयात उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने मरिन ड्राईव्ह येथील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल व बिकेसी येथील ट्रायडंट हॉटेल ताब्यात घेतले आहे.

बेड्स वाढवणार -

बेड्स कमी पडू नये म्हणून जसलोक या खासगी हॉस्पिटलमधील 250 बेड ताब्यात घेतेले जाणार आहेत. त्यात 40 बेड आयसीयूचे आहेत. अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात 30 आयसीयू बेड वाढवले जाणार आहेत. गोरेगाव नेस्को येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये 1 हजार 500 बेड वाढवणार त्यातील बहुतेक बेड हे ऑक्सिजनचे असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

मुंबईत 9925 नवे रुग्ण, 54 रुग्णांचा मृत्यू

शहरात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या काही दिवस 8 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. गेले दोन दिवस रुग्ण संख्येत घट झाली होती. सोमवारी 12 एप्रिलला 6 हजार 905 तर मंगळवारी 13 एप्रिलला 7898 रुग्ण आढळून आले होते. बुधवारी त्यात वाढ झाली असून 9925 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 9 हजार 273 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Last Updated : Apr 15, 2021, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.