ETV Bharat / state

Avighn Park Fire अविघ्न पार्क इमारतीच्या आगीत जखमी फायरमनला रुग्णालयातून सुटी - मुंबई आग दुर्घटना लेटेस्ट बातमी

अविघ्न पार्क इमारतीला ( Avighn Park Fire In Mumbai )लागलेल्या आगीत दोन अग्निशमन दलाचे जवान जखमी ( Mumbai Fire Brigade ) झाले. मात्र या जवानांनी जीवाची बाजी लाऊन इमारतीमधून नागरिकांना बाहेर काढले. या आगीत कोणताही नागरिक जखमी झाला नाही. मात्र अविघ्न पार्क इमारतीला वारंवार आग लागण्याच्या घटनांचा सामना करावा लागत आहे. अविघ्न पार्क आगीच्या घटनेत मुंबई अग्निशमन दल ( Mumbai Fire Brigade ) आणि महापालिका ( Mumbai Municipal Corporation ) कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

Avighn Park Fire In Mumbai
अग्निशमन दलाचे जवान
author img

By

Published : Dec 16, 2022, 8:09 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी करीरोड येथील अविघ्न पार्क ( Avighn Park Fire ) या इमारतीला आग लागली होती या इमारतीला आज पुन्हा एकदा आग लागल्याचे समोर आले आहे दरम्यान या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलाने ( Mumbai Fire Brigade ) इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या ६० ते ७० जणांची सुटका केली. दुपारी २ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत कोणीही रहिवासी जखमी झाले नाहीत मात्र २ फायरमन आग विझवताना जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

अविघ्न पार्कला आग - मुंबईच्या करी रोड येथील महादेव पालव मार्ग, भारत माता सिनेमा समोरील उत्तुंग अशा अविघ्न पार्क ( Avighn Park Fire ) या इमारती मधील २२ व्या मजल्यावरील एका घरामध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला ( Mumbai Fire Brigade ) सकाळी १०.४५ च्या दरम्यान देण्यात आली. त्यानुसार मुंबई अग्निशमन दल मुंबई पोलीस आणि महापालिका कर्मचारी ( Mumbai Municipal Corporation ) घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लेव्हल वनची असल्याची घोषणा मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आली आहे. आगीच्या ठिकाणी ४ फायर इंजिन आणि ४ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने दुपारी २ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर आगीच्या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. आग लागलेल्या घरामधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

२ अग्निशमन जवान जखमी - अविघ्न पार्क ( Avighn Park Fire ) या इमारतीत लागलेली आग विजवताना अग्निशमन दलाच्या ( Mumbai Fire Brigade ) जवानांना घरात दरवाजा तोडून घुसावे लागले. हवेमुळे आगीची तीव्रता अधिक होत होती. २२ व्या मजल्यापासून वरच्या मजल्यापर्यंत त्यात आग विजवण्याचे काम करताना धुरामुळे श्र्वसनाचा त्रास होत होता. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले. त्यांना केईएम् रुग्णालयात ( KEM Hospital Mumbai ) दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रामदास सनस वय ३७ वर्षे व महेश पाटील वय २६ वर्षे अशी या जवानांची नावे आहेत.

याआधीही लागली होती आग - अविघ्न पार्क ( Avighn Park Fire ) या इमारतीला मागील वर्षीही आग लागली होती त्यावेळी या इमारतीची अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले होते. आग लागलेल्या ठिकाणावरून एका व्यक्तीने आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा याच इमारतीला आग लागल्याने या इमारतीच्या अग्नी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कुचकामी यंत्रणेमुळे आग - गेल्या वर्षी करीरोड येथील अविघ्न पार्क ( Avighn Park Fire ) या इमारतीला आग लागली होती या इमारतीला आज पुन्हा एकदा आग लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल कॉल येताच दाखल झाले. मात्र येथील सुरक्षा आणि इतर यंत्रणांना आगीपासून कसा बचाव करायचा याची माहिती नाही. येथील यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Thackeray Faction Leader Kishori Padnekar ) यांनी केला आहे.

६० ते ७० जणांची सुटका - करी रोड येथील हा विघ्न पार्क या इमारतीला आज सकाळी आग लागली. २२ व्या मजल्यावर लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या ( Mumbai Fire Brigade ) जवानांना दरवाजा तोडून घरात घुसावे लागले. तसेच शिडीच्या सहाय्याने रहिवाशांना बाहेर काढून २३ व २४ व्या माळ्यावरून २५ व्या माळ्यावर न्यावे लागले. अशा प्रकारे ६० ते ७० जणांना इमारती बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन केंद्र उपाधिकारी व्ही. एन. सांगळे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.