ETV Bharat / state

Prithvi Shaw Selfie Controversy : क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणी वाढणार? सपना गिलने तक्रार दाखल करत केले गंभीर आरोप - पृथ्वी

सपना गिलला पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरणी जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर तिने पृथ्वी शॉसह अन्य जणांवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Prithvi Shaw Selfie Controversy
पृथ्वी शॉ
author img

By

Published : Feb 21, 2023, 9:11 PM IST

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत सेल्फीच्या वादात अडकलेली सोशल मीडियावर सतत प्रभाव टाकणारी सपना गिल हिला मुंबईतील स्थानिक कोर्टातून जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर सपना गिलने पृथ्वी शॉ वर गंभीर आरोप केले आहेत. पृथ्वी शॉसह अन्य जणांविरोधात तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सपना गिलचे गंभीर आरोप: सपना गिल म्हणाली की, मी तिथे जाऊन त्यांना थांबवले. माझ्या मित्राने पुरावा दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी मला बेसबॉलने मारहाण केली. एक किंवा दोन लोकांनी मला मारले आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आणि मला चापटही मारली, असे आरोप सपना गिलने केले आहेत.

पृथ्वी शॉसह अन्य जणांवर तक्रार दाखल: सपना देशमुख हिचे वकील अ‍ॅड. अली काशिफ देशमुख यांनी याबाबत माहिती दिली की, पृथ्वी शॉ, आशिष सुरेंद्र यादव, ब्रिजेश आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीरपणे सपना गिलचा विनयभंग केल्याबद्दल भादंवि 351, 354 आणि 509 नुसार फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मारहाण केल्याचा आरोप: सपना गिल आरोप करत म्हणाली की, आम्ही कोणाला मारहाण केली नाही, पैसेही मागितले नाहीत. त्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केले. मी एकही सेल्फी मागितला नाही. आम्ही आनंद घेत होतो, म्हणून माझ्या मित्राने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. मी पाहिले की ते माझ्या मित्राला मारहाण करत असल्याचे तिने सांगितले.

पृथ्वी शॉच्या अडचणी वाढणार?: आम्ही त्यांना विमानतळावर थांबवण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी आणि त्याच्या मित्राने जमावाला बोलावून पळण्याचा प्रयत्न केला. ते आक्रमक आणि मद्यधुंद होते. त्यांनी आमची माफी मागितली. पण 16 फेब्रुवारीला मला कळले की माझ्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, म्हणून मी 20 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली, असे सपना गिलने सांगितले आहे. पृथ्वी शॉवर तक्रार दाखल झाल्यामुळे पृथ्वीच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

पृथ्वी शॉ सेल्फी वाद: मुंबईतील सांताक्रूझ येथे 16 फेब्रुवारी रोजी एका हॉटेलमध्ये मित्र आशिष यादवसोबत डिनर करताना भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत सेल्फीचा वाद सुरू झाला होता. एका अज्ञात व्यक्तीने पृथ्वीकडून पुन्हा पुन्हा सेल्फी घेण्याचा आग्रह सुरू केला होता. यामुळे नाराज झालेल्या पृथ्वीने नकार दिला होता. यानंतर त्या व्यक्तीने क्रिकेटरशी वाद घातला आणि गैरवर्तन केले, त्याचवेळी हॉटेल व्यवस्थापकाच्या मध्यस्थीवरून त्या व्यक्तीला हॉटेलच्या आवारातून हाकलून देण्यात आले होते. मात्र, यानंतर हॉटेलमधून बाहेर येताच त्या व्यक्तीने पृथ्वीच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केला होता. यावेळी पृथ्वी आणि आशिष दोघेही कारमध्ये बसले. यानंतर गदारोळ झाल्याने पृथ्वीला दुसऱ्या गाडीतून पाठवण्यात आले होते. दुसरीकडे आशिष आणि इतरांनी त्यांचे वाहन ओशिवरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हेही वाचा: Sapna Gill Selfie Controversy : पृथ्वी शॉसोबत सेल्फी वादात अडकलेल्या सपना गिलला अखेर जामीन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.