मुंबई : टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना राज्य सरकारच्या वतीनं दिला जाणारा पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' देऊन आज गौरवण्यात आलं. रतन टाटा यांच्या मुंबईतील कुलाबा येथील हलकाई या निवासस्थानी हा पुरस्कार अत्यंत सन्मानानं टाटा यांना देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रतन टाटा यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित होते.
टाटा म्हणजे विश्वास : उद्योगपती रतन टाटा म्हणजे विश्वास, टाटा समूह म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव, अशा शब्दात पुरस्कार दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीनं दिला जाणारा पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' हा रतन टाटा यांना दिला गेल्यामुळे या पुरस्काराची उंची आताच वाढली आहे. टाटा समूह गेल्या अनेक वर्षांपासून देशात विविध क्षेत्रात काम करीत आहे. विविध उद्योगात टाटा समूहाचं मोठं योगदान आहे. टाटा समूह नेहमीच अडचणीच्या काळात देशाच्या आणि राज्याच्या मदतीला धावून आला आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या मिठाच्या उत्पादनापासून ते एअरलाइन्सच्या उद्योगापर्यंत टाटा उद्योग समूह सर्व स्तरावर पसरला आहे. त्यासोबत त्यांनी आपली विश्वासार्हतासुद्धा टिकवून ठेवली आहे. रतन टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
-
🏆 टाटा समूहाचे अध्यक्ष, पद्म विभूषण श्री रतन टाटा जी यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला प्रतिष्ठित महाराष्ट्र ‘उद्योगरत्न पुरस्कार - २०२३’ प्रदान सोहळा@RNTata2000 @mieknathshinde @AjitPawarSpeaks @dvkesarkar @samant_uday #ratantata #tatagroup #udyogratna #mumbai #maharashtra… pic.twitter.com/Sc9dJNm6Ue
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🏆 टाटा समूहाचे अध्यक्ष, पद्म विभूषण श्री रतन टाटा जी यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला प्रतिष्ठित महाराष्ट्र ‘उद्योगरत्न पुरस्कार - २०२३’ प्रदान सोहळा@RNTata2000 @mieknathshinde @AjitPawarSpeaks @dvkesarkar @samant_uday #ratantata #tatagroup #udyogratna #mumbai #maharashtra… pic.twitter.com/Sc9dJNm6Ue
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2023🏆 टाटा समूहाचे अध्यक्ष, पद्म विभूषण श्री रतन टाटा जी यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला प्रतिष्ठित महाराष्ट्र ‘उद्योगरत्न पुरस्कार - २०२३’ प्रदान सोहळा@RNTata2000 @mieknathshinde @AjitPawarSpeaks @dvkesarkar @samant_uday #ratantata #tatagroup #udyogratna #mumbai #maharashtra… pic.twitter.com/Sc9dJNm6Ue
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2023
'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्कारानं सन्मान : रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियामधील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' या पुरस्कारानं नुकतच सन्मानित करण्यात आलं आहे. त्यासोबत रतन टाटा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी यापूर्वी सन्मानित करण्यात आलं असून केंद्र सरकारच्या वतीनं दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'पद्मभूषण पुरस्कार' रतन टाटा यांना सन 2000 मध्ये देण्यात आला होता.
हेही वाचा-