ETV Bharat / state

World No Tobacco Day : '... तर भारत 40 टक्के कर्करोगमुक्त होईल' - जागतिक तंबाखू विरोधी दिन

भारतातील तंबाखू सेवनाचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये हे प्रमाण अतिशय धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. तंबाखू सेवनाचे प्रमाण थांबले तर भारतातील 40 टक्के लोक कर्करोगमुक्त होतील, असा दावा प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. भरत भोसले यांनी केला आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईत 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत दिली.

World No Tobacco Day
कर्करोग
author img

By

Published : May 30, 2023, 8:56 PM IST

Updated : May 31, 2023, 6:28 AM IST

तंबाखूचे दुष्परिणाम सांगताना डॉ. भरत भोसले

मुंबई: 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' हा 31 मे रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर प्रयत्न केले जातात. वास्तविक तंबाखू सेवनामुळे तोंडाची दुर्गंधी आणि अस्वच्छतेसह अनेक गंभीर आजार उद्‌भवतात. यामुळे तंबाखू सेवन टाळल्यास कर्करोगासारख्या अत्यंत गंभीर अशा रोगापासून मुक्तता होऊ शकते, असा दावा बॉम्बे हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. भरत भोसले यांनी केला आहे.

तंबाखू आणि धूम्रमानाचे बळी: भारतातील 40 टक्के लोकांना होणारा तोंडाचा आणि फुफुसाचा कर्करोग हा केवळ तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ तसेच धूम्रपानामुळे होतो. सध्या देशात मिझोराम हे तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगात सर्वांत आघाडीवर असलेले राज्य आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण म्हणूनच अधिक आढळते. मुंबईसारख्या महानगरांमध्ये हवेचे प्रदूषण आणि धूम्रपानाचे प्रमाण जास्त आहे. उघड्या जागेवर होणाऱ्या धूम्रपानामुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीही कर्करोगाच्या बळी ठरतात. त्यामुळे उघड्यावरील धूम्रपान आणि प्रदूषण टाळले पाहिजे, असे मत डॉ. भोसले यांनी मांडले.

अद्ययावत उपचार पद्धती: कर्करोगाच्या उपचार पद्धतीमध्ये अलीकडे आमूलाग्र बदल झालेला आहे. नवीन 'इम्युनो थेरपी' आल्यामुळे कर्करोगावर उपचार करणे आता अधिक सोपे झाले आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हा रोग उघडकीस आला तरीही त्यावर उपचार शक्य आहे. यातून रुग्णाचे आयुष्य पाच ते दहा वर्षांनी वाढवता येते. मात्र, त्यासाठी वेळेत निदान आणि योग्य उपचार व्हायला पाहिजे, असेही डॉ. भोसले म्हणाले.

शरीरातील उतींची होते तपासणी: कर्करोगाचे निदान ही सगळ्यात महत्त्वाचे असते. ते वेळेत झाले तर त्यावर उपचार करणे अधिक सोपे होते. त्यासाठी आता अद्ययावत तंत्रज्ञान आले आहे. यामध्ये शरीरातील उतींची प्रयोगशाळेत तपासणी करून निदान केले जाते. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या तपासण्या थोड्या खर्चिक असतात. तरी आम्ही रुग्णांना काही ट्रस्टच्या माध्यमातून दिलासा मिळवून देतो. आम्ही रुग्णांना कुठून निधी उपलब्ध होऊ शकतो याचीही माहिती देतो. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचतात. वेळेत निदान आणि उपचार झाले तर कित्येक रुग्ण कर्करोगातून बरेसुद्धा होऊ शकतात, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

प्रतिबंध हाच मुख्य उपाय: कर्करोगावर मात करण्यासाठी नवीन उपचार पद्धती आणि तंत्रज्ञान वापरले जात असले तरी प्रतिबंध हाच सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. तोंडाचा किंवा फुफुसाचा कर्करोग होऊ नये, यासाठी तंबाखू जन्यपदार्थ आणि धूम्रपानाचे सेवन टाळावे. याबाबतीत आता जनजागृती झाली नाही तर भविष्यात कर्करोग मोठ्या प्रमाणात पसरलेला दिसेल, अशी चिंताही कर्करोग तज्ज्ञ डॉ. भरत भोसले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

  1. International sex worker day 2023 : आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर डे 2023; जाणून घ्या इतिहास आणि उद्देश
  2. World Bicycle Day 2023 : जागतिक सायकल दिन 2023; सायकल चालवणे आरोग्य आणि पर्यावरणासाठी आहे फायदेशीर
  3. World vape day 2023 : काय आहे व्हेपिंग ई-सिगारेट ? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम आणि धोके

Last Updated : May 31, 2023, 6:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.