मुंबई: केंद्रातील भाजपा सरकार विरोधात 'इंडिया' या विरोधी पक्षांच्या आघाडीची तिसरी बैठक उद्या मुंबईत होणार आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झालीय. 'इंडिया' आघाडीच्या मुंबईतील बैठकीत लोगोनंतर 'इंडिया' आघाडीच्या समन्वयक पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले आहेत. निवडणुका जवळ आल्यानं मला वाटतं या सर्व बैठका महत्त्वाच्या आहेत. आम्हाला आता शेवटचा रोडमॅप तयार करावा लागेल. जागावाटपाची घाई नको, असे यावेळी फारुख अब्दुल्ला माध्यमांशी बोलताना म्हणाले.
-
#WATCH | As he arrives in Mumbai for the third meeting of INDIA alliance, National Conference president Farooq Abdullah says, "I think all meetings are important. This is all the more important because elections are approaching. We will have to prepare the final roadmap now."… pic.twitter.com/MUnfpBQZuZ
— ANI (@ANI) August 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | As he arrives in Mumbai for the third meeting of INDIA alliance, National Conference president Farooq Abdullah says, "I think all meetings are important. This is all the more important because elections are approaching. We will have to prepare the final roadmap now."… pic.twitter.com/MUnfpBQZuZ
— ANI (@ANI) August 30, 2023#WATCH | As he arrives in Mumbai for the third meeting of INDIA alliance, National Conference president Farooq Abdullah says, "I think all meetings are important. This is all the more important because elections are approaching. We will have to prepare the final roadmap now."… pic.twitter.com/MUnfpBQZuZ
— ANI (@ANI) August 30, 2023
Live Updates-
- मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीबाबत आपचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीत माध्यमांशी प्रतिक्रिया दिलीय. मंत्री भारद्वाज म्हणाले, ही युती टिकणं अवघड असल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे. मात्र, ही युती टिकली तर केंद्रात भाजपा स्थापन करू शकणार नाही.
- इंडियाच्या आघाडीच्या बैठकीकरता आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव मंगळवारीच मुंबईत पोहोचले आहे. माध्यमांशी बोलाताना लालूप्रसाद यादव म्हणाले, निवडणुका जवळ येत असताना आगामी काळाची तयारी करणे हा आमचा अजेंडा असणार आहे. उमेदवार ठरवायचे असतील तर राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे."
- 'इंडिया' आघाडीत सामील होणार नसल्याचा पुनरुच्चार बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केलाय. 'एनडीए' आणि 'इंडिया' आघाडीतील बहुतांश पक्ष हे गरीबांच्या विरोधात, जातीयवादी, भांडवलशाही धोरण असलेले आहेत. त्यांच्या धोरणांविरुद्ध बसपा सातत्याने संघर्ष करत आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी भूमिका मायावती यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट करत मांडलीय.
- महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई येथे 31 ॲागस्ट आणि1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीबाबत माहिती देण्यासंदर्भात महाविकास आघाडीची आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद आहे. ही पत्रकार परिषद आज दुपारी 4 वाजता ग्रॅंड हयात हॅाटेल वाकोला मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
-
#WATCH | Mumbai | Ahead of the meeting of the INDIA alliance, RJD chief Lalu Prasad Yadav says, "The agenda will be to make preparations for the times ahead. Elections are approaching. If candidates have to be decided, we need to sit together."
— ANI (@ANI) August 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
When asked about the Convener for… pic.twitter.com/39TbR5ZUah
">#WATCH | Mumbai | Ahead of the meeting of the INDIA alliance, RJD chief Lalu Prasad Yadav says, "The agenda will be to make preparations for the times ahead. Elections are approaching. If candidates have to be decided, we need to sit together."
— ANI (@ANI) August 30, 2023
When asked about the Convener for… pic.twitter.com/39TbR5ZUah#WATCH | Mumbai | Ahead of the meeting of the INDIA alliance, RJD chief Lalu Prasad Yadav says, "The agenda will be to make preparations for the times ahead. Elections are approaching. If candidates have to be decided, we need to sit together."
— ANI (@ANI) August 30, 2023
When asked about the Convener for… pic.twitter.com/39TbR5ZUah
गेल्या पंधरा दिवसापासून बैठकीचे नियोजन सुरू- 'इंडिया' आघाडीची बैठक मुंबई येथे ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीच्या तयारीसाठी गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडीतील घटक पक्ष तयारीला लागले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून वेगवेगळे प्रकारच्या बैठका घेत कार्यक्रमांचं नियोजन करत होते. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आढावा बैठक बुधवारी रात्री हॉटेल ग्रँड हयात येथे पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
'इंडिया' आघाडीच्या संयोजकपदी मल्लिकार्जुन खर्गे ? इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशातील भाजप विरोधातील 26 पक्ष उपस्थित असणार आहेत. विशेषतः यामध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, सात राज्यांचे मुख्यमंत्री असणार आहेत. 31 ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार आहे. एक सप्टेंबरला 'इंडिया' आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची संयोजक पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. कारण मल्लिकार्जुन खर्गे यांचे इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांशी चांगलं ट्युनिंग आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी ग्रँड हयात हॉटेलच्या 200 पेक्षा जास्त रूम बुक करण्यात आल्या आहेत. मुंबईतील बैठकीमध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरदेखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
-
#WATCH | Delhi: AAP Minister Saurabh Bhardwaj on the third INDIA Alliance meeting to be held in Mumbai says, "Political observers are saying that it is very difficult that this alliance remains united. But if this happens it is definite that BJP would not be able to form a… pic.twitter.com/LyJOdB52T2
— ANI (@ANI) August 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Delhi: AAP Minister Saurabh Bhardwaj on the third INDIA Alliance meeting to be held in Mumbai says, "Political observers are saying that it is very difficult that this alliance remains united. But if this happens it is definite that BJP would not be able to form a… pic.twitter.com/LyJOdB52T2
— ANI (@ANI) August 30, 2023#WATCH | Delhi: AAP Minister Saurabh Bhardwaj on the third INDIA Alliance meeting to be held in Mumbai says, "Political observers are saying that it is very difficult that this alliance remains united. But if this happens it is definite that BJP would not be able to form a… pic.twitter.com/LyJOdB52T2
— ANI (@ANI) August 30, 2023
काँग्रेस नेता राहुल गांधी यांचा १ सप्टेंबर रोजी टिळक भवन येथे सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्याच्या तयारीचा आढावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मंगळवारी घेतला. आमच्यासमोर भाजपाला हरवण्याचं लक्ष्य आहे. जागावाटपासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाल्याप्रमाणं मेरीटवर आम्ही जागावाटप करणार आहोत. तसेच पंतप्रधान मोदींचा चेहरा लोकांना आवडत नाही- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
महाराष्ट्र काँग्रेसच्या वॉर रूमचं उद्घाटन होणार - इंडियाची बैठक झाल्यानंतर मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वार रूमचे उद्घाटन राहुल गांधी यांच्या हस्ते संपन्न होणार याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिली. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढून आरक्षण दिले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी ते टिकवलं नाही, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राज्याचे सरकार लंगडत सुरू आहे. त्यांच्यात खूप अंतर्गत वाद सुरू असल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला.
हेही वाचा-