ETV Bharat / state

Independence Day 2023: राज्य व केंद्र यामधील समन्वयाचा नवा अध्याय आपण लिहित आहोत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात ध्वजारोहण केले. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणातून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

Independence Day 2023
स्वातंत्र्य दिन २०२३
author img

By

Published : Aug 15, 2023, 1:04 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : आज देशभर स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र तसेच राज्याच्या कामाची यादी जनतेला वाचून दाखवली. त्याचबरोबर राज्य व केंद्र यांच्यातील समन्वयाचा नववा अध्याय आपण लिहित आहे, असे सांगत त्यांनी एकंदरीत केंद्राच्या सहकार्याने राज्यात झालेली विकास कामे सांगितली आहेत.

फडणवीस पवारांची साथ : याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय स्वतंत्र दिनाच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देताना आनंद होत आहे. आपण गरजूंच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे. पंतप्रधान यांनी 'मेरी माटी मेरा देश' कार्यक्रम घेऊन आपल्याला जबाबदारीची आठवण करून दिली आहे. पहिल्या सरकारकडून एक रुपया जाहीर झाला, तर पंधरा पैसे हातात पडायचे. परंतु आता पूर्ण रुपया जनतेला भेटत आहे. केंद्राप्रमाणे राज्यात विकासाची गंगा व्हावी, यासाठी काम करता आले. केंद्र आणि राज्याचा समन्वय ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही साथ मोठ्या प्रमाणावर मिळते आहे.

राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू : शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना चालू केली. दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत सरकारने बळीराजासाठी केलेली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना सूट दिली आहे. राज्यातील नागरिकांना मोफत उपचार आणि मोफत तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योजक महाराष्ट्राला पसंती देत आहे. उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला एक नंबरवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

चांगला समाज घडवण्याची जबाबदारी : पूर्वी काही लोकांनी 'गरिबी हटाव' नारा दिला होता. पण त्यांना त्यात यश आले नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांना बाहेर काढण्याचे काम पंतप्रधानांनी करून जनतेला दिलासा दिला आहे. भ्रष्टाचाराची कीड पंतप्रधानांनी दूर केली आहे. चांगला समाज घडवण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. गेले वर्षभर आपण काम केले. राज्य व केंद्र यांमधील समन्वयाचा नवा अध्याय आपण लिहित आहोत. समाजहिताचे अनेक निर्णय सरकार घेत आहे. 'शासन आपल्या दारी' या क्रांतीकारी निर्णयात सव्वा कोटी लोकांना लाभ दिला आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या लोकांच्या मनातील आनंद समाधान देतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

  1. Independence Day 2023 : 2047 ची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आगामी 5 वर्ष ठरणार महत्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पुढच्या वर्षी. . .
  2. Pune Crime : नाचताना पबमध्ये भिरकावला तिरंगा... गायिकेसह आयोजकाविरोधात गुन्हा दाखल
  3. India independence Day 2023 Updates: बापुंच्या स्वप्नातील भारत साकारायचा आहे-पंतप्रधान मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.