ETV Bharat / state

Increased Electricity Rates : राज्यात वीज दरवाढ अटळ ! ग्राहकांचे मासिक बिल 200 रुपयांनी महागणार

author img

By

Published : Nov 24, 2022, 9:19 AM IST

वीज खरेदीपोटी महावितरणाला किमान ४० हजार कोटी रुपयांच्या वसुलीची गरज असून त्यामुळे राज्यात वीज दरवाढ अटळ (Increased Electricity Rates) आहे. ही वाढ किमान ६० पैसे प्रति युनिट इतकी मोठी असण्याची शक्यता असून यामुळे महावितरणाच्या ग्राहकांचे मासिक वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात (monthly bill will increase by Rs 200 of consumers) आहे.

Increased Electricity Rates
वीज दरवाढ

मुंबई : कोळसा टंचाईमुळे आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेल्या वीजनिर्मिती खर्च, बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, क्रॉस सबसिडीच्या रुपात मिळालेले कमी अनुदान अशा अनेक कारणांमुळे महावितरणाचा वीज खरेदी खर्च खूप (Increased Electricity Rates) वाढला. त्यासाठी आता महावितरणाला किमान ४० हजार कोटी रुपयांच्या वसुलीची गरज आहे. त्यामुळे राज्यात वीज दरवाढ अटळ असून ही वाढ किमान ६० पैसे प्रति युनिट इतकी मोठी असण्याची भीती वर्तवली जात आहे.

महानिर्मितीची सर्वाधिक भिस्त कोळशावर : विविध कारणांमुळे महागलेल्या वीज खरेदीपोटी महावितरणाला किमान ४० हजार कोटी रुपयांच्या वसुलीची गरज असून त्यामुळे राज्यात वीज दरवाढ अटळ आहे. ही वाढ किमान ६० पैसे प्रति युनिट इतकी मोठी असण्याची शक्यता असून यामुळे महावितरणाच्या ग्राहकांचे मासिक वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्य सरकारी महावितरण ही कंपनी सर्वाधिक वीज महानिर्मितीकडून खरेदी करते. महानिर्मितीची सर्वाधिक भिस्त औष्णिक अर्थात कोळशावर आधारित विजेवर असते. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात व यावर्षी एप्रिल - मे दरम्यान कोळसा उपलब्धता घटली व त्याचवेळी मागणी उच्चांकावर गेली होती. त्यानंतर जुलै - ऑगस्टमध्ये देखील महानिर्मितीला महागड्या कोळशाने वीज निर्मिती करावी लागली. महागड्या दराने महावितरणाला वीज विक्री करावी लागली आहे. याच प्रकारे खाजगी औष्णिक वीज उत्पादकांनीही महागडी वीज महावितरणला विकली (monthly bill will increase by Rs 200 of consumers) आहे.

४० हजार कोटींचा खर्च : उन्हाळ्यात मागणी वाढली असताना कोल इंडियाकडून 20% कमी कोळसा मिळणार होता, हे आधीच सांगण्यात आले होते. प्रत्यक्ष तेवढा कोळसा देखील वीजनिर्मिती कंपन्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांना बाहेरून कोळसा खरेदी करावा लागला. महावितरणला देखील अनेकदा बाजारातून महागडी वीज खरेदी करावी लागली. त्या पोटी त्यांना किमान २० हजार कोटी रुपये अतिरिक्त खर्च आला आहे. त्याखेरीज क्रॉस सबसिडीतील पैसा देखील करोनादरम्यान कंपनीला मिळाला नाही. ते नुकसान देखील २० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. अशा प्रकारे किमान ४० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च महावितरणला आला आहे. असे ज्येष्ठ वीजतज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले (Increased electricity rates in state) आहे.

१३ टक्के अधिक खर्च : महानिर्मिती सात औष्णिक वीज प्रकल्पांतील ३० संचाद्वारे वीजनिर्मिती करते. या संचामधील वीज विक्रीचा जुलै महिन्यात किमान २.४६७ रुपये ते कमाल ४.९५७ रुपये प्रतियुनिट असलेल्या दर ऑगस्ट महिन्यामध्ये किमान २.८३७ रुपये ते ५.४६७ रुपये प्रतियुनिटवर पोहोचला. या सर्व स्थितीमध्ये कंपनीला सप्टेंबर अखेरपर्यंत ३४ हजार ८०६ कोटी रुपयांचा वीज खरेदी खर्च झाला असून तो १३ टक्के अधिक असल्याचे महावितरणने महाराष्ट्र वीज नियमक आयोगाला सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे आता वीज दरवाढ अटळ असून किमान ६० पैसे प्रति युनिट ही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात (electricity rates in state) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.